श्रेयश अय्यरचे पहिले शतक; पंजाब किंग्स प्लेऑफमध्ये?

LSG vs PBKS: भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या आयपीएल 2026 च्या 68 व्या रोमांचक सामन्यात पंजाब किंग्स (PBKS) संघानं यजमान लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG) 7 गडी राखून पराभव केला. पंजाबनं सलग 6 सामन्यांच्या पराभवांची मालिका खंडित करत हा विजय मिळवला असून, यामुळे त्यांचे प्लेऑफचे आव्हान अजूनही या विजयामुळे जिवंत राहिले आहे.

सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनऊ सुपर जायंट्स फलंदाजीसाठी उतरलेल्या लखनऊची सुरुवात वादळी झाली. सलामीवीर जोश इंग्लिसनं 44 चेंडूंत 72 धावांची स्फोटक खेळी खेळली. तसेच आयुष बदोनीनं आक्रमक खेळी करत 18 चेंडूंत 43 धावा केल्या. शेवटी अब्दुल समदनंही 30 धावांची मोलाची खेळी केली आणि या सगळ्यांच्या जीवावर लखनऊनं निर्धारित 20 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 196 धावांचा मजबूत स्कोर उभा केला.

श्रेयस अय्यरची नाबाद शतकी खेळी
197 धावांच्या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर सलामीवीर प्रियांश आर्या बाद झाल्यामुळे पंजाब थोडा अडचणीत आला होता. मात्र, खेळपट्टीवर आलेल्या कर्णधार श्रेयस अय्यरनं मैदानावर महत्त्वाची खेळी केली. अय्यरनं लखनऊच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत अवघ्या 51 चेंडूंत 11 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीनं नाबाद 101 धावांची ऐतिहासिक खेळी केली. विशेष म्हणजे हे त्याचे आयपीएल कारकिर्दीतील पहिलेच शतक ठरले. त्याला प्रभसिमरन सिंगनं 69 धावांची (39 चेंडू) उत्कृष्ट साथ दिली. या दोघांमधील 140 धावांच्या मॅचविनिंग भागीदारीच्या जोरावर पंजाबने 18 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 200 धावा करत 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

पंजाबचे प्लेऑफचे गणित कसे राहिलं?
या ऐतिहासिक विजयानंतर पंजाब किंग्सनं 14 सामन्यांतून 15 गुणांसह (+0.309 नेट रनरेट) गुणतालिकेत थेट चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. पंजाबचे सर्व साखळी सामने संपले असून त्यांचे प्लेऑफचे गणित आता पूर्णपणे आज खेळवल्या जाणाऱ्या इतर सामन्यांवर अवलंबून आहे. जर आज राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सकडून पराभव झाला, तर पंजाब थेट पात्र ठरेल. दुसरीकडे, कोलकत्ता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय मिळवला, तरी त्यांचा रनरेट पंजाबपेक्षा कमी असल्यानं केकेआरला अत्यंत मोठ्या फरकानं जिंकावं लागेल, अन्यथा पंजाबचा संघ अव्वल चारमध्ये आपलं स्थान निश्चित करेल. त्यामुळे आजच्या सामन्यातकडे अनेक आयपीएल चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.