IPL Winner RCB 2026: ३१ मे २०२६ रोजी खेळवल्या गेलेल्या आयपीएल २०२६ च्या ऐतिहासिक अंतिम सामन्यात (IPL Final) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघानं गुजरात टायटन्सचा (GT) ५ गडी राखून पराभव केला. अहमदाबाद येथील असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना पार पडला. या दिमाखदार विजयासोबतच आरसीबीनं सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरून ‘डिफेंडिंग चॅम्पियन’ असल्याचा रूबाब सिद्ध केला आहे.
कर्णधार रजत पाटीदारचा ऐतिहासिक महाविक्रम
आरसीबीला सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनवून त्यांचा कर्णधार रजत पाटीदारनं आयपीएलच्या इतिहासात आपलं नाव सुवर्णअक्षरांनी कोरलं आहे. आयपीएलच्या इतिहासात सलग दोन हंगामात (Back-to-Back) कर्णधार म्हणून विजेतेपद पटकावणाऱ्या महेंद्रसिंग धोनी (चेन्नई सुपर किंग्स – २०१०, २०११) आणि रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स – २०१९, २०२०) या दोन महान कर्णधारांच्या महाविक्रमाची पाटीदारनं बरोबरी केली आहे. आयपीएलच्या १९ वर्षांच्या इतिहासात हा पराक्रम करणारा तो फक्त तिसराच कर्णधार ठरला आहे. तसेच कर्णधार म्हणून पहिल्या आणि दुसऱ्या हंगामात सलग दोन आयपीएलचे जेतेपद जिंकणारा तो पहिलाच कर्णधार आहे.
किंग विराट कोहलीची नाबाद खेळी आणि आरसीबीचा विजय
या सामन्यात गुजरात टायटन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं मैदानावर सर्वाधिक वेळ खेळ केला. कारण एकेकीकडे आरसीबीच्या विकेट्स पडत असतानी विराटनं डाव सावरला आणि नाबाद ७५ धावांची मॅचविनिंग खेळी साकारली. त्याच्या या संथ आणि तितक्याच आक्रमक खेळीच्या बळावर आरसीबीनं गुजरातच्या गोलंदाजांना नमवलं. आरसीबीच्या फलंदाजांनी उत्कृष्ट भागीदारी रचत हे कठीण लक्ष्य ५ गड्यांच्या मोबदल्यात पार केले आणि ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.
या सामन्यात विराट कोहलीला त्याच्या नाबाद ७५ धावांच्या खेळीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

