अबब! तब्बल १६,००० कोटींपेक्षा जास्त रूपयांना आरसीबी विकत घेतली

जागतिक क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय फ्रँचायझींपैकी एक असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाच्या मालकी हक्काबाबत एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घटना घडली आहे. तब्बल 18 वर्षांनंतर या संघाची मालकी बदलली असून, टाइम्स इंटरनेट लिमिटेड (Times Internet Limited) नं आरसीबी संघाला विकत घेतलं आहे.

IPL 2026: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) या लोकप्रिय फ्रँचायझीनं विक्रीच्या बाबतीतही सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे आणि सर्व जुने रेकॉर्ड मोडले आहेत. युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड (USL/Diageo) ने या संघाची १००% मालकी एका शक्तिशाली समूहाला (Consortium) विकली आहे. हा व्यवहार 1.78 अब्ज डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे 16,700 कोटी रुपयांना झाला आहे. या प्रचंड किमतीमुळे आरसीबी आता आयपीएलमधील सर्वात महागडा संघ बनला आहे.

टाइम्स इंटरनेट आणि सत्यन गजवानी यांची प्रतिक्रिया
टाइम्स इंटरनेट लिमिटेडचे अध्यक्ष सत्यन गजवानी (Satyan Gajwani) यांनी या ऐतिहासिक विजयानंतर अत्यंत उत्साही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आरसीबी हा फक्त एक संघ नाही, तर ती एक जागतिक ओळख आणि भावना आहे. आमची डिजिटल क्षेत्रातील ताकद आणि आरसीबीची प्रचंड मोठी ‘फॅन बेस’ यांचा मेळ घालून आम्ही या संघाला एका नव्या उंचीवर नेऊ. आम्हाला आरसीबीच्या वारशाचा अभिमान आहे आणि चाहत्यांना एक नवा डिजिटल अनुभव देण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

संघाचे काम कोण पाहणार?
मालकी बदलली असली तरी संघाच्या मूळ रचनेत तातडीनं मोठा बदल अजूनतरी केलेला नाही. आदित्य बिर्ला समूह (Aditya Birla Group) या समूहाचं नेतृत्व आर्यमन विक्रम बिर्ला करणार आहेत, जे आता आरसीबीचे नवीन चेअरमन असतील. तर टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप (Times Group) या समूहाचे सत्यन गजवानी हे आरसीबीचे व्हाइस चेअरमन म्हणून जबाबदारी सांभाळतील.

RCB चा पहिला सामना?
आरसीबीची आयपीएल 2026 मधील पहिली मॅच सनराजर्स हैदराबाद संघासोबत 28 मार्चला होणार आहे. ही मॅच त्याच्याच घरच्या मैदानावर (M. Chinnaswamy Stadium) होणार आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.