मुंबईचा सगल तिसरा पराभव; कुठे गमवला सामना

MI vs RCB IPL 2026: काल (12 एप्रिल 2026) संध्याकाळी झालेल्या आयपीएलच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघानं मुंबई इंडियन्स (MI) वर 18 धावांनी शानदार विजय मिळवला. हा थरारक सामना मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर पार पडला.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो आरसीबीच्या फलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा ठरवला. आरसीबीनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 240 धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर फिल साल्टनं आक्रमक सुरुवात करत फक्त 36 चेंडूंत 78 धावा कुटल्या, ज्यात 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. त्याला विराट कोहलीनं 50 (38 चेंडू) धावांची साथ देत 120 धावांची सलामी दिली. त्यानंतर कर्णधार रजत पाटीदारनं वादळी फलंदाजी करत अवघ्या 20 चेंडूंत 53 धावा (4 चौकार, 5 षटकार) ठोकल्या. शेवटच्या षटकांत टिम डेव्हिडनं 16 चेंडूंत नाबाद 34 धावा काढून धावसंख्या 240 पर्यंत नेली.

प्रत्युत्तरात 241 धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. मात्र, मधल्या फळीत शेरफेन रदरफोर्डनं सर्वाधिक संघर्ष केला. त्यानं फक्त 31 चेंडूंत नाबाद 71 धावा (1 चौकार, 9 षटकार) फटकावून सामना शेवटपर्यंत जिवंत ठेवला होता. कर्णधार हार्दिक पंड्यानंही 22 चेंडूंत 40 धावांचं योगदान दिलं. मात्र, आरसीबीच्या गोलंदाजीसमोर मुंबईला 20 षटकांत 5 बाद 222 धावांपर्यंतच मजल मारता आली. आरसीबीकडून सुयश शर्मानं सर्वाधिक (2) बळी घेतले.

सामना कुठे फिरला?
हा सामना आरसीबीनं फलंदाजीच्या जोरावर जिंकला. पहिल्या 10 षटकांतच आरसीबीनं विकेट न गमावता मोठी धावसंख्या उभारली होती, ज्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांवर प्रचंड दडपण आलं. मुंबईसाठी रदरफोर्डनं शेवटच्या 4 षटकांत 52 धावा वसूल करून आशा जागृत केल्या होत्या, पण सुरुवातीच्या षटकांत संथ गतीनं पडलेल्या विकेट्स आणि आरसीबीनं उभारलेला डोंगराएवढा स्कोअर यामुळे मुंबईला हा सामना 18 धावांनी गमवावा लागला.

गुणतालिकेत स्थान
आरसीबीच्या कालच्या विजयामुळे सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. आरसीबीनं 4 पैकी 3 सामने जिंकून 6 गुण मिळवले आहेत. तर दुसरीकडं मुंबईला या हंगामातील सगल तिसरा पराभव स्विकारावा लागला आहे, आणि फक्त 1 विजय मिळवला आहे त्यामुळे मुंबईचा संघ 2 गुणांसह गुणतालिकेत 8 व्या स्थानावर आहे.

आणखी हेही वाचा
विश्वनाथचा सुवर्णवेध; रिक्षाचालकाचा मुलगा झाला चॅम्पियन-
https://agcsport.tv/other/vishwanaths-gold-medal-rickshaw-drivers-son-becomes-championship-winner/

धोनी खेळणार आजचा सामना?https://agcsport.tv/cricket/will-dhoni-play-todays-match-2/

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.