‘या’ कारणांमुळे मुंबईने मिळवला विजय

MI vs GT IPL 2026: काल (सोमवर, 20 एप्रिल 2026) झालेल्या आयपीएलच्या सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) संघाने गुजरात टायटन्स (GT) वर 99 धावांनी दणदणीत विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या विजयासह मुंबईनं आपली सलग चार पराभवांची मालिका मोडीत काढली आहे आणि पुनरागमन केलं.

गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबईची सुरुवात खराब झाली आणि एका वेळ अशीही जेव्हा त्यांची अवस्था 46/3 अशी होती, पण तिलक वर्मानं अवघ्या 45 चेंडूंत नाबाद 101 धावांची (8 चौकार, 7 षटकार) ऐतिहासिक खेळी करून संघाला सावरलं. तसेच या शतकानं तो मुंबईच्या संघासाठी शतक करणारा आठवा खेळाडू ठरला आहे. त्याला नमन धीरनं 22 चेंडूंत 45 धावा करून मोलाची साथ दिली. ज्या मुंबई इंडियन्सच्या धावा 150 सुद्धा होतील का नाही असं वाटणाऱ्या मुंबईनं या सगळ्यांच्या जोरावर, विशेषत: तिलक वर्माच्या खेळीनं 20 षटकांत 5 बाद 199 धावांचा डोंगर उभा केला.

200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा डाव पूर्णपणे पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. जसप्रीत बुमराहनं डावाच्या पहिल्याच चेंडूवर साई सुदर्शनला बाद करून गुजरातला मोठा धक्का दिला. आणि जो बुमराह गेल्या अनेक सामन्यापासून विकेटलेस होत त्याला या हंगामातील त्याची पहिली विकेट मिळाली. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरला मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या आला आणि जॉश बटलरची विकेट घेऊन गेला. गुजरातचा कोणताही फलंदाज मुंबईच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर टिकू शकला नाही. वॉशिंग्टन सुंदरनं सर्वाधिक 26 धावा केल्या, तर इतर मोठे खेळाडू जसं की शुभमन गिल आणि ग्लेन फिलिप्स स्वस्तात बाद झाले. त्यामुळे गुजरातचा संघ पुर्णपणे खिळखिळा झाला आणि गुजरातचा संपूर्ण संघ 15.5 षटकांत अवघ्या 100 धावांवर सर्वबाद झाला. आणि मुबंई इंडियन्सनं हा सामना तब्बल 99 धावांनी जिंकला.

सामना मुंबईच्या बाजूनं कसा आला?
सुरूवातीला फलंदाजीत मुंबईच्या संघानं संघर्ष करताना दिसला पण तिलक वर्माच्या फलंदाजीमुळे चांगल्या धावा केल्या. नंतर गोलंदाजीमध्ये मुंबईनं पॉवरप्लेमध्येच सगळा गेम फिरवला. त्यानंतर, अश्वनी कुमारनं 4 बळी घेऊन गुजरातच्या मधल्या फळीचा कणा मोडला, तर मिचेल सँटनर आणि अल्लाह गजनफर यांनी प्रत्येकी 2 बळी घेऊन विजयावर शिक्कामोर्तब केले. तसेच क्षेत्ररक्षणातही कोणत्याही चुका न केल्यामुळेही हा सामना पुर्णपणे मुंबईच्या ताब्यात गेला.

मुंबईनं आतापर्यंत 6 सामने खेळले असून त्यातील दोन सामन्यांत विजय मिळवून 4 गुणांसह सध्या गुणतालिकेत 7व्या स्थानावर आहे. कालचा विजय हा मुंबईसाठी अंत्यत गरजेचा होता कारण त्यांना गेल्या चारही सामन्यात पराभवाचा स्विकार करावा लागला आहे. या (गुजरातविरूद्धच्या) विजयानं त्यांना आणि त्यांच्या चाहत्यांना नक्कीच दिलासा मिळाला असेल.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.