Mumbai Indians: आयपीएल 2026 च्या प्लेऑफमधून बाहेर झालेल्या मुंबई इंडियन्सच्या संघानं चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध झालेल्या सामन्यात एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. आता मुंबई इंडियन्स टी20 क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त धावा करणारा संघ बनला आहे. इंग्लंडच्या समरसेटचा रेकॉर्ड तोडून मुंबई इंडियन्सनं टी20 फॉर्मेटमध्ये 50,000 धावा करणारा जगातील पहिला संघ बनला आहे.
मुंबई इंडियन्सनं शनिवारी 2 मे ला 308वा टी20 सामना खेळला. मुंबईच्या फ्रेंचाइजीनं आयपीएलमध्ये 286 आणि चॅम्पियन लीग टी20 मध्ये 22 सामने खेळले. या सगळ्या सामन्यानं टी20 मध्ये सगळ्यात जास्त धावा करण्याच्या यादीत मुंबई इंडियन्स पहिल्या स्थानावर आहे. तर इंग्लंडची समरपेट संघ दुसऱ्या स्थानावर आली आहे. समरसेटनं 303 टी20 सामन्यात 48,244 धावा केल्या आहेत.
यासोबतच गतवर्षीचा विजेता असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ 295 टी20 सामन्यामध्ये 47,304 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान चेन्नई सुपर किंग्सच्या संघानं 286 सामन्यात 46,438 धावांसह चौथ्या स्थानावर आहे.
रोहित शर्मा मुंबईसाठी सगळ्यात जास्त धावा
मुंबई इंडियन्स माजी कर्णधार रोहित शर्मा यानं मुंबई इंडियन्स साठी टी20 सामने खेळताना सगळ्यात जास्त धावा केल्या आहेत. त्यानं आतापर्यंत 240 सामन्यात 6286* धावा केल्या आहेत, त्याच्यानंतर सुर्यकुमार यादव (3933*) आणि कायरन पोलार्ड (3951) यांनी मुंबईसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत.

