आयपीएलच्या आधीच अनेक खेळाडू स्पर्धेतून बाहेर

IPL 2026: काही दिवसांवर आयपीएल राहिली असताना अनेक संघ पुर्णपणे स्थिर नाहीत. कारण सध्या अनेक संघांचे लक्ष दुखापतग्रस्त खेळाडूंची जागा भरून काढण्यासाठी संघ करत असलेल्या धडपडीवरच केंद्रित आहे. जवळपास यंदाच्या आयपीएलला 5 ते 6 खेळाडू पुर्णपणे मुकणार आहे. त्यामुळे अनेक संघाना त्यांच्या जागी कोणाला संधी देयची याकडं संघाचं लक्ष लागलं आहे. तसेच काही खेळाडू सुरूवातीच्या काही सामन्यांना सुद्धा उपलब्ध नसणार आहे.

पहिला संघ चेन्नई सुपर किंग्स आहे. कारण डेथ ओव्हर्समध्ये उत्तम गोलंदाजी करणारा नेथन एलिस हा यंदा खेळणार नाही. याला हॅमस्ट्रिंग दुखापत झाल्यामुळे तो संपुर्ण हंगाम बाहेर असणार आहे. त्यामुळे सध्या सीएसकेचा संघ त्याच्या जागी कोणाला बदली खेळाडू म्हणून घेयचा याचा विचार करत आहे. तर मॅथ्यू शॉर्ट हा सुरूवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे असं सांगितलं जात आहे.

नुकत्याच समोर आलेल्या बातमीनुसार राजस्थान रॉयल्सचा all rounder खेळाडू सॅम करण याला दुखापत झाल्यामुळे हा सुद्धा संपुर्ण आयपीएल हंगाम उपलब्ध नसणार आहे. त्याच्या अनुपस्थितीमुळे एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अखेरच्या षटकांमध्ये चांगली कामगिरी करण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे तो रॉयल्सच्या संघाचा एक महत्त्वाचा घटक बनला होता आणि त्याची जागा भरणे सोपे नसेल.

केकेआर या संघाला सुद्धा चांगलाच धक्का बसला आहे. त्यांच्या मुख्य गोलंदाजांपैकी एक असलेला हर्षित राणा हा संपुर्ण काळ आयपीएल हंगामाला मुकणार आहे. तसेच यावर्षीच्या आयपीएलसाठी लिलावात घेतलेल्या श्रीलंकन गोलंदाज मथिशा पथिराना हा सुद्धा सुरूवातीचे काही सामने खेळणार नाही. अशी माहिती समोर आली आहे. पण तो लवकर बरा होऊन केकेआर संघात परत येईल अशी माहिती श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने दिली आहे. पण हे दोन्ही खेळाडू नसल्यामुळे केकेआरची डोकेदुखी वाढली आहे.

सगळ्यात मोठा झटका बसलेल्या संघापैकी असलेला संघ सनराजर्स हैदराबाद हा एक आहे. या संघाचा कर्णधार पॅट कमिंग्स दुखापतीमुळे काही सामने उपलब्ध नसणार आहे. आणि हे SRH साठी हाणीकारण सांगितलं जात आहे. पण संघाने काही सामन्यांसाठी भारताचा युवा खेळाडू आणि यष्टिरक्षक इशान किशन याला कर्णधार केलं आहे. तसेच या संघातील जॅक एडवर्ड्स हा all rounder खेळाडू पायाच्या दुखापतीमुळे संपुर्ण आयपीएल हंगाम खेळणार नाही.

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचा मुख्य गोलंदाजापैकी असलेला जॉश हेझलवूड हा काही सामने बाहेर असणार आहे. तसेच लखनौ सुपर जायंट्सचा वानिंदू हसरंगा, पंजाब किंग्सचा लॉकी फर्ग्युसन(पालकत्व रजा), दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य गोलंदाज मिचेल स्टार्क हे खेळाडू सुद्धा आयपीएलचे काही सामन्यांना मुकणार आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.