डर्बन: आगामी महिला टी20 विश्वचषक 2026 च्या पूर्वतयारीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ही 5 सामन्यांची टी20 मालिका आजपासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना डर्बनमधील ऐतिहासिक किंग्समीड क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.
नुकत्याच झालेल्या 2025 च्या 50 ओव्हर विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ आमनेसामने आला होता. त्यावेळी भारताने त्यांना पराभूत करून विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ आता आपल्या घरच्या मैदानावर होणारी ही टी20 मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल आणि त्या (वनडे विश्वचषक) पराभवाचा बदला घेण्याचाही प्रयत्न करेल.
हेड-टू-हेड रेकॉर्ड
भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील टी20 चे सामने नेहमीच चुरशीचे राहिले आहेत. पण तरीही भारताचं वर्चस्व त्यांच्यावर राहिलं आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 19 टी20 सामने झाले असून, त्यापैकी भारतानं 10 सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेला 6 सामन्यांत विजय मिळवता आला आहे. उर्वरित 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर भारताचा रेकॉर्ड चांगला असून, 2018 मधील मागील दौऱ्यात भारतानं 3-1 असा विजय मिळवला होता. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना यंदाच्या टी20 मालिकेत सुद्धा आशा आहे की, नक्कीच भारतीय संघच बाजी मारेल.
संभाव्य प्लेईंग 11
भारतीय महिला संघ: स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, पूजा वस्त्राकर/क्रांती गौड, अरुंधती रेड्डी, श्री चरणी, रेणुका सिंह ठाकूर.
दक्षिण आफ्रिका महिला संघ: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, सुने लुस, ॲनेके बॉश, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, अनेरी डेर्कसेन, सिनालो जाफ्ता, अयाबोंगा खाका, तुमी सेखुखुने, नॉनकुलुलेको म्लाबा.
आणखी हेही वाचा
पॅट कमिन्सचे पुनरागमन निश्चित; पण पुढच्या सामन्यात इशान किशनच करणार नेतृत्व-https://agcsport.tv/cricket/pat-cummins-return-is-certain-but-ishan-kishan-will-lead-in-the-next-match/
कार्लोस अल्काराजची बार्सिलोना ओपनमधून धक्कादायक माघार-https://agcsport.tv/tennis/carlos-alcarazs-shock-withdrawal-from-barcelona-open/

