PBKS vs SRH IPL 2026: आज आयपीएलमध्ये दुपारी पंजाब किंग्स (PBKS) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) हे दोन संघ एकमेकांना भिडणार आहेत. हा सामना न्यू चंदीगड येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (मुलनपूर) येथे पार पाडणार आहे. आजचा दुपारी होणाऱ्या या सामन्यात पंजाब किंग्स कायम अजेय राहण्यासाठी प्रयत्न करतील, तर सनरायझर्स हैदराबादसाठी हा सामना आपल्या कामगिरीत सातत्य आणण्याचा प्रयत्न असेल.
पंजाब किंग्सचा (PBKS) संघ यंदाच्या हंगामात अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांनी आतापर्यंत खेळलेले तिन्ही सामने जिंकले आहेत (चेन्नई आणि गुजरात विरुद्ध विजय, तर कोलकत्ता विरुद्धचा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला). सध्या 5 गुणांसह पंजाब गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर दुसरीकडं सनरायझर्स हैदराबादची (SRH) सुरुवात यंदा काहीशी संमिश्र झाली असून त्यांनी 3 पैकी फक्त एक सामना जिंकला आहे आणि दोन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे सध्या 2 गुणांसह हैदराबाद सहाव्या स्थानावर विराजमान आहे.
हेड-टू-हेड रेकॉर्ड
आयपीएल इतिहासात या दोन संघांमध्ये आतापर्यंत एकूण 24 सामने झाले आहेत. यात सनरायझर्स हैदराबादनं फक्त सामने जिंकले नाहीत तर त्यांच्यावर एकतर्फी वर्चस्व गाजवलं आहे. हैदराबादनं 24 सामन्यांपैकी 17 सामने जिंकले आहेत, तर पंजाब किंग्सला 7 सामन्यांत बाजी मारता आली आहे. विशेष म्हणजे, पंजाबला 2022 नंतर त्यांच्याविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. हैदराबादनं या दोन संघांमधील मागील सलग चार सामने जिंकले असून आज संघाला आणि चाहत्यांना आशा आहेत की, पंजाब हा नकोसा असलेला विक्रम मोडून काढेल.
आजची संभाव्य प्लेइंग 11 (Probable XI)
पंजाब किंग्स (PBKS): प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), कूपर कॉनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.
सनरायझर्स हैदराबाद (SRH): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (यष्टीरक्षक), हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, लियाम लिविंगस्टन, अनिकेत वर्मा, इशान मलिंगा, हर्षल पटेल, हर्ष दुबे आणि जयदेव उनाडकट.

