हैदराबादचा चेन्नईवर 5 गडी राखून विजय; सीएसके प्लेऑफच्या बाहेर?

CSK vs SRH IPL 2026: काल 18 मे 2026 रोजी चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या आयपीएल 2026 च्या 63 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघानं चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) 5 गडी राखून पराभव केला. हैदराबादच्या या महत्त्वपूर्ण विजयामुळे त्यांनी अधिकृतपणे प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले आहे.

या सामन्यात सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण सामन्यादरम्यान अनेकदा असं जाणवलं की, त्याचा हा फलंदाजी घेण्याचा निर्णय चुकला आहे. कारण चेपॉकच्या खेळपट्टीवर चेन्नईची सुरुवात संथ झाली. कोणत्याही फलंदाजाला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. डेवाल्ड ब्रेव्हिसच्या सर्वाधिक 44 धावा आणि मधल्या फळीतील फलंदाजांच्या छोट्या योगदानामुळे चेन्नईनं निर्धारित 20 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात 180 धावा केल्या.

181 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादकडून सलामीवीर इशान किशन यानं सीएसकेच्या गोलंदाजांना घाम फोडला. त्यानं अवघ्या 47 चेंडूंत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या आतिशबाजीसह 70 धावांची सामनाविजेती खेळी खेळली. त्याला हेनरिक क्लासेननं 26 चेंडूंत 47 धावा कुटून मजबूत साथ दिली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी केली. हैदराबादनं हे लक्ष्य 19 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 181 धावा करून सहज पूर्ण केलं आणि 5 गडी राखून सामना खिशात घातला.

चेन्नई सुपर किंग्सचा संघ हा सामना प्रामुख्यानं त्यांच्या संथ फलंदाजी आणि खराब डेथ ओव्हर्स गोलंदाजीमुळे हरला. पहिल्या डावात त्यांना शेवटच्या षटकांमध्ये अपेक्षित वेगानं धावा वाढवता आल्या नाहीत. तसेच 181 धावांचा बचाव करताना चेन्नईचे फिरकीपटू इशान किशन आणि क्लासेन या जोडीला रोखण्यात अपयशी ठरले. वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज आणि मुकेश चौधरी यांनी मोक्याच्या क्षणी महागडी षटके टाकली, ज्यामुळे सामना चेन्नईच्या हातातून निसटला.

प्लेऑफच गणित कसं आहे?
या विजयासह सनरायझर्स हैदराबादनं प्लेऑफचे तिकीट पक्कं केलं आहे. विशेष म्हणजे, हैदराबादच्या या विजयामुळे गुजरात टायटन्स (GT) हा संघ देखील तांत्रिकदृष्ट्या प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे.

तर या घरच्या मैदानानावरील पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्सचं स्थान धोक्यात आलं असून ते थेट बाद होण्याच्या (Elimination) उंबरठ्यावर पोहोचले आहेत. आता त्यांना त्यांचा पुढील सामना मोठ्या फरकानं जिंकावं लागेल आणि इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल.

आणखी हेही वाचा
धोनी आज घेणार निवृत्ती; त्यानेच दिले संकेत-
https://agcsport.tv/cricket/dhoni-will-retire-today-he-himself-gave-the-hint/?_thumbnail_id=1911

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.