मुंबईसाठी आजचा सामना किती महत्त्वाचा?

IPL 2026 MI vs SRH: आयपीएल 2026 च्या 41 व्या सामन्यात आज (29 एप्रिल) चुरशीची लढत पहायला मिळणार आहे. मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर आज मुंबई इंडियन्स (MI) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना मुंबईसाठी स्पर्धेत स्थान टिकवण्याच्या दृष्टीनं ‘करा किंवा मरा’ असा असेल.

यंदाच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादचा संघ जबरदस्त फॉर्मात आहे. 8 सामन्यांपैकी 5 विजयांसह 10 गुण मिळवून ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत. अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांसारखे फलंदाज सध्या इतर संघाच्या गोलंदाजांसाठी काळ ठरत आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सची अवस्था नाजूक असून 7 सामन्यांत फक्त 2 विजयांसह ते नव्या स्थानावर आहेत. मात्र, मागील सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या पराभवामुळे मुंबईचा रनरेट सुद्धा घसरला आहे. पण आजच्या सामन्यात मुंबईच्या संघाला आणि चाहत्यांना आशा आहे की, आजचा सामना नक्की जिंकेल.

हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये पारडे कुणाचे जड?
आयपीएल इतिहासात हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध अत्यंत चुरशीचे ठरले आहेत. पण आतापर्यंत झालेल्या 25 सामन्यांपैकी हैदराबादने 10 तर मुंबईने 15 सामने जिंकले आहेत. त्यामुळे या आकड्यांवरून हे दिसून येतं की, मुंबईचं वर्चस्व हैदराबादवर आहे.

मुंबई इंडियन्स (MI): क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), नमन धीर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), टिळक वर्मा, शेरफेन रदरफोर्ड, केशव महाराज, जसप्रीत बुमराह, क्रिश भगत, अल्लाह गजनफर, अश्वनी कुमार

सनरायझर्स हैदराबाद (SRH): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, पॅट कमिन्स (कर्णधार), हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, ईशान किशन (यष्टीरक्षक), हर्ष दुबे, प्रफुल हिंगे, साकिब हुसेन, इशान मलिंगा

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.