ICC T20 world cup 2026: भारताने सुपर ८ मध्ये पहिला पराभव झिम्बाव्बे संघाचा केला होता. आणि आता नुकत्याच झालेल्या भारत आणि वेस्टइंडिजच्या सामन्यात भारताने वेस्टइंडिज संघावर विजय मिळवला. आणि हा विजय मिळवून भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीत इंग्लंडच्या संघाविरूद्ध खेळणार आहे. हा सामना ५ मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
भारत आणि इंग्लंड आमनेसामने टी२०
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी२० मध्ये आतापर्यंत २९ सामने झाले आहेत. त्यात भारतीय संघाच वर्चस्व दिसून आलं आहे. भारताने आतापर्यंतच्या २९ सामन्यांपैकी १७ सामन्यांत इंग्लंडच्या संघाचा पराभव केला आहे. तसेच इंग्लंड संघ भारतासमोर १२ वेळा विजेता राहिला आहे. या आकड्यांवरून भारतीय संघाचं त्यांच्यावर असलेल वर्चस्व दिसून येत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील आयसीसी टी२० विश्वचषकात उपांत्य फेरीतील आकडेवारी
भारतीय संघ आणि इंग्लंडचा संघ आयसीसी टी२० विश्वचषकात पुन्हा एकदा उपांत्य फेरीत समोरासमोर आले आहेत. याआधी सलग दोनदा भारत आणि इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीत आमनेसामने आला होता. पहिल्यांदा २०२२ आणि नंतर २०२४ मध्ये. आता पुन्हा एकदा २०२६ मध्ये हे दोन बलाढ्य संघ एकमेकांविरूद्ध भिडणार आहेत. यांच्यात आतपर्यंत उपांत्य फेरीतील कामगिरी पाहिली तर २०२२ ला इंग्लंडने भारताचा पराभव केला होता. त्यामुळे तिथेच भारताचं विश्वचषक स्वप्नही भंगल होतं.
२०२४ ला पुन्हा एकदा इंग्लंडचाच संघ भारतासमोर आला. पण यावेळी निर्णय मात्र भारतीय संघाच्या बाजूने लागला. या सामन्यात भारताने मागिल उपांत्य फेरीचा बदला घेऊन फायनलला जागा पक्की केली होती. आता पुन्हा एकदा तोच (इंग्लंड) संघ समोर आला आहे.
टी२०आय मध्ये भारतीय संघाचं घरच्या मैदानावर इंग्लंडविरूद्ध रेकॉर्ड
भारतीय संघाचं घरच्या मैदानावर टी२०आय मध्ये इंग्लंड विरूद्धची आकडेवारी चांगली आहे. भारताने घरच्या मैदानावर इंग्लंड संघाविरूद्ध आतापर्यंत एकूण १५ सामने झाले आहेत. त्यातील भारताने १० सामन्यांत इंग्लंडचा पराभव केला आहे, तर इंग्लंडने ५ वेळा भारताचा पराभव केला आहे.

