गुजरातची विजयी हॅटट्रीक; केकेआरचा आणखी एक पराभव

GT vs KKR IPL 2026: नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या कालच्या (17 एप्रिल 2026 ) गुजरात टायटन्स (GT) संघानं कोलकत्ता नाईट रायडर्स (KKR) वर 5 गड्यांनी थरारक विजय मिळवला. हा कालचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या विजयामुळे गुजरातनं आपल्या विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. तर केकेआरला सगल सहा वेळा पराभव (एक अनिर्णित) स्विकारावा लागला आहे.

कोलकत्ता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सुरुवातीलाच मोहम्मद सिराजनं मोठा झटका केकेआरच्या संघाला दिला. त्यानं कर्णधार रहाणेला शून्यावर बाद केलं. त्यामुळे कोलकत्त्याची फलंदाजी गडगडली आणि एका वेळी तर त्यांची अवस्था अत्यंत नाजूक झाली होती. अशा वेळी कॅमरन ग्रीननं एकाकी झुंज देत 55 चेंडूंत 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 79 धावांची शानदार खेळी केली. इतर फलंदाजांच्या अपयशामुळे कोलकत्त्याचा संपूर्ण संघ 20 षटकांत 180 धावांवर बाद झाला. गुजरातकडून कगिसो रबाडानं 3, तर मोहम्मद सिराज आणि अशोक शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

प्रत्युत्तरात उतरलेल्या गुजरातनं सुरूवातीपासून चांगला खेळ दाखवला. 181 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलनं 50 चेंडूंत ८ चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 86 धावांची मॅचविनिंग खेळी केली. मधल्या फळीत जोस बटलर (25) आणि साई सुदर्शन (22) यांनीही उपयुक्त योगदान दिलं. सामन्याच्या शेवटच्या षटकात ग्लेन फिलिप्स बाद झाल्यामुळे थोडी धाकधूक निर्माण झाली होती, पण राहुल तेवातिया आणि शाहरुख खान यांनी शांत राहून 19.4 षटकांत लक्ष्य पूर्ण केलं आणि गुजरातला विजय मिळवून दिला.

सामना कुठे फिरला?
हा सामना पॉवरप्लेमधील कामगिरीमुळे गुजरातच्या बाजूनं फिरला. गुजरातनं आपल्या पॉवरप्लेमध्ये 71 धावा कुटल्या होत्या, तर कोलकत्त्याला 3 विकेट्स गमावून संथ सुरुवात करावी लागली. कॅमरन ग्रीनच्या अर्धशतकामुळे कोलकत्त्यानं 180 धावांपर्यंत मजल मारली खरी, पण गिलच्या आक्रमक खेळीसमोर हे आव्हान छोटं पडलं. कोलकत्त्याचे गोलंदाज, विशेषतः वरुण चक्रवर्ती (2 बळी), यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण ते पुरेसा ठरला नाही.

या विजयामुळे गुजरात टायटन्स संघ आता 6 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे, तर कोलकत्त्याला हा सलग सहावा पराभव असून ते तळालाच आहेत.

आणखी हेही वाचा
पॅट कमिन्सचे पुनरागमन निश्चित; पण पुढच्या सामन्यात इशान किशनच करणार नेतृत्व-
https://agcsport.tv/cricket/pat-cummins-return-is-certain-but-ishan-kishan-will-lead-in-the-next-match/

सुजीतने अंतिम फेरीत जपानी मल्लाचा पराभव करत मिळवले सुवर्णयश-https://agcsport.tv/other/sujith-defeated-a-japanese-wrestler-in-the-final-to-win-the-gold-medal/

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.