KKR vs RR IPL 2026: आयपीएल 2026 मध्ये कोलकत्ता नाईट रायडर्स पहिल्या विजयाला तरसत आहेत पण त्यांच्या संघासाठी आणि चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. केकेआरच्या संघात श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिरानाची एन्ट्री निश्चित झाली आहे. पथिराना काल (शनिवारी) संघात जुळला आहे. पथिराना दुखापतीतून सावरला आहे आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डानंही त्याला एनओसी दिली आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकत्ता नाईट रायडर्स यांचे वाईट दिवस अजूनही संपले नाहीत. अजिंक्य रहाणेच्या कर्णधारपदाखाली खेळत असलेल्या केकेआर संघानं अद्याप या हंगामात एकही सामना जिंकला नाही. यामागे त्यांच्या संघातील अनेक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर आहेत तर काही खेळाडू फॉर्ममध्ये नाहीत. दुखापतीमुळे संघातील दोन प्रमुख गोलंदाज संघात नव्हते, दरम्यान त्यातल्याच एका खेळाडूचं संघात पुनरागमन निश्चित झालं आहे. हा आणखी कोण नाही तर श्रीलंकाचा वेगवान गोलंदाज मथिशा पथिराना आहे.
चेन्नई सुपर किंग्सनं पथिरानाला रिलीज केल्यानंतर केकेआरनं यंदाच्या मिनी ऑक्शनमध्ये त्याला 18 करोड रूपये इतक्या मोठ्या रकमेत घेऊन आपल्या संघात घेतलं आहे. पण दुखापतीमुळे तो सुरूवातीचे काही सामने खेळू शकला नाही. याआधी सुद्धा केकेआरच्या प्रमुख गोलंदाजापैकी असलेला हर्षित राणा सुद्धा दुखापतीमुळे बाहेर आहे पण आता मथिशा पथिराना आल्यामुळे संघाला निश्चितच थोडातरी दिलासा मिळाला असेल.
केकेआरच्या संघाला यंदाच्या हंगामात अद्याप एकही सामना जिंकला नाही. त्यांनी आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत आणि त्या सगळ्या सामन्यांत त्यांना पराभव (एक अनिर्णित) स्वीकारावा लागला आहे. सध्या एका गुणांसह केकेआरचा संघा शेवटच्या स्थानावर आहे. पण आजच्या (19 एप्रिल) सामन्यात संघाला आणि चाहत्यांना आशा आहे की, नक्कीच पहिला विजय मिळेल.
आणखी हेही वाचा
ए.एस. शरवानिका बनली फिडे वर्ल्ड रॅपिड अंडर-१२ चॅम्पियन-https://agcsport.tv/other/a-s-sharwanika-becomes-fide-world-rapid-under-12-champion/

