गायकवाडने सांगितले पराभवाचे कारण

CSK: चेन्नई सुपर किग्सच्या कर्णधार ऋतुराज गायकवाड (ruturaj gaikwad) यानं सांगितलं आहे की, का? हैदराबादविरूद्धच्या सामन्यात त्यांचा 10 धावांनी पराभव झाला आहे.

शनिवारी (18 एप्रिल) झालेल्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि सनराजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात हैदराबाद संघानं 10 धावांनी विजय मिळवून या हंगामात तिसरा विजय मिळवला आहे. तर दुसरीकडं, सीएसकेला चौथा पराभवाचा झटका बसला आहे. सामन्यात एक वेळ अशीही आली होती की, सीएसके धावांचा पाठलाग करण्यात आणि सामना जिंकण्यात सक्षम दिसत होता. आणि असं वाटत होतं की, सीएसके सहज हा सामना जिंकेल, पण शेवटी तरीही सीएसकेला पराभवाचा सामना करावा लागला. तसेच सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यानंही मानलं होतं की, जिंकण्याच्या खूप जवळ होतो.

काय बोलला ऋतुराज गायकवाड?
सामना झाल्यावर ऋतुराज गायकवाडनं सांगितलं की, “मला वाटत होतं की, ज्या पद्धतीनं पॉवरप्लेमध्ये आमची गोलंदाजी चालू होती त्या हिशोबानं 220 किंवा 230 धावा होतील असं वाटत होतं. पण नंतर उत्कृष्ट गोलंदाजी झाली आणि 20 ते 30 धावाही कमी झाल्या”.

गायकवाड पुढेही म्हणाला, “10 षटकांत (ओव्हर्स) 90 च्या आसपास धावांची गरज होती. पण एक चांगली आमच्यात भागिदारी झाली नाही. काही षटकांच आमच्या विकेट्स सुद्धा गेल्या. तसेच काही ओव्हर्समध्ये धावाही कमी झाल्या आणि आम्हाला माहिती होतं की, शेवटच्या षटकात जास्त धावा होणार नाहीत. आणि शेवटी तेच झालं. पण हे सगळ क्रेडीट त्यांच्या (हैदराबाद) गोलंदाजांना जातं”.

गोलंदाजांना विषयी काय बोलला ऋतुराज?
गायकवाडनं हेही सांगितलं की, “मला वाटतंय की, गेल्या काही सामन्यांपासून आमचं गोलंदाजी यूनिट चांगली कामगिरी करत आहे. आज सुद्धा पॉवरप्लेनंतर त्यांनी चांगली कामगिरी केली. अभिषेक शर्मानेही पॉवरप्लेमध्ये चांगली फलंदाजी केली. त्यानं आमच्या गोलंदाजांना चांगलंच धुतलं, पण या सामन्यात आम्ही कोणतीही साधारण गोलंदाजी केली नाही. पण तरीही त्यानं चांगली फलंदाजी केली. पण त्यानंतर आम्हाला सुद्धा लय मिळाली आणि त्यानंतर त्याचा आम्ही चांगला फायदा घेतला. आमच्या सगळ्या गोलंदाजांनी योगदान दिलं…गुरजपनीत, जेमी, नूर आणि अंशुनंही चांगलं प्रदर्शन केलं”.

आणखी हेही वाचा
लिओनेल मेस्सीच्या ‘त्या’ गोलमुळे जिंकला इंटर मियामी-
https://agcsport.tv/football/inter-miami-won-thanks-to-that-goal-from-lionel-messi/

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.