IPL 2026 Match Today: आयपीएल 2026 च्या हंगामाला आजपासून (28 मार्च) सुरूवात होणार आहे. हा सामना बेंगलोरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आजच्या सामन्यात गतविजेता राहिलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात हा सामना होणार आहे.
गतवर्षी आरसीबीनं पहिल्यांदाच जेतेपद मिळवलं होतं. यंदाच्या हंगामातही हा संघ चांगली कामगिरी करेल असं अनेकांचं मत आहे. पण यंदाच्या हंगामाविषयी सांगायचं झालं तर हा हंगाम चालु होण्यापुर्वीच त्यांचे काही खेळाडू दुखापतीमुळे बाहेर बसले आहेत. त्यातलाच एक म्हणजे जोश हेजलवुड हा काही सामने बाहेर आहे तर श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज जो आरसीबीच्या मुख्य गोलंदाजापैकी एक असलेला नुवान थुशारा यालाही यंदाच्या आयपीएलमध्ये खेळता येणार नाही. कारण श्रीलंका क्रिकेट बोर्डानं त्याला आयपीएल खेळण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आता आरसीबीच्या सामन्यांवर त्यांचे काही गोलंदाज नसल्यामुळे परिणामही होऊ शकतो.
तर दुसरीकडे सुद्धा अशीच काही परिस्थिती आहे. कारण सनराजर्स हैदराबाद यांच्या संघातील सुद्धा काही खेळाडू सुरूवातीचे काही सामने बाहेर आहेत. विशेष म्हणजे संघाचा कर्णधार पॅट कमिंन्स हा दुखापतीमुळे काही सामने बाहेर आहे. त्यामुळे त्याच्या जागी इशान किशन याला कर्णधार करण्यात आलं आहे. तर जॅक एडवर्ड्स हा all rounder खेळाडू पायाच्या दुखापतीमुळे संपुर्ण आयपीएल हंगाम खेळणार नाही. त्यामुळे हे दोन मोठे झटके SRH ला बसले आहेत. आता यावर हा संघ कसा मात करेल याकडे पहावं लागणार आहे.
जर यांचे आतापर्यंतचे आमनेसामने काय रेकॉर्ड्स आहेत हे पाहिले तर RCB आणि SRH यांच्यात 25 सामने झाले आहेत. त्यातल्या 11 सामन्यांत आरसीबीनं विजय मिळवला आहे तर 13 सामन्यांत त्यांचा पराभव झाला आहे. तर SRH 13 सामन्यांत विजयी आणि 11 सामन्यांत पराभूत झाला आहे. आणि एक सामना अनिर्णीत राहिला आहे.
RCB संभाव्य प्लेइंग 11– कर्णधार रजत पाटीदार, विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पड्डिकल, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, रोमारिओ शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जोकोब डफी
SRH संभाव्य प्लेइंग 11– कर्णधार इशान किशन, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन, लियाम लिव्हिंगस्टोन, कमिंदू मेंडिस, नीतीश कुमार रेड्डी, हर्षल पटेल, शिवम मावी, हर्ष दुबे, इशान मलिंगा

