MS Dhoni: आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) कडून पदार्पण करणारा उत्तर प्रदेशचा युवा खेळाडू समीर रिझवी याचा एक दावा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात त्यानं सीएसकेचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याला नमाज वाचण्याचा सल्ला दिला होता आणि यामुळेच त्याला पुढच्याच आयपीएल हंगामातून सीएसकेच्या संघानं बाहेरचा रस्ता दाखवला होता. पाहुयात काय सत्य आहे?
एक्स (X) वर अनेक पोस्ट समोर आले आहेत. तर त्यातील एका पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ” समीर रिझवीला भेटा. हा उत्तर प्रदेशचा क्रिकेटर आहे. यूपी टी20 लीगमध्ये कानपुर सुपरस्टारसाठी खेळत आहे. चेन्नईनं त्याला आईपीएलमध्ये घेतलं. मागिल वर्षी त्याला गुघड्याच्या दुखापतमुशे त्रस्त होता. समीरनं धोनीला सांगितलं की, या दुखापतीतून लवकर बर होयचं असेल तर त्यानं (धोनी) नमाज पठण केलं पाहिजे”. पुढं लिहिलं, ” धोनीनं त्याला पुढच्याच सामन्यात आणि संपुर्ण हंगामातसाठी संघातून बाहेर काढलं. त्यानं त्याला सीएसकेमधून सुद्धा बाहेरचा रस्ता दाखवला.
अशाच काही पोस्ट समोर आल्या आहेत, ज्यात अनेकांनी दावे केले आहेत की समीरनं माहीला नमाज पठण करण्याचा सल्ला दिला आहे.
🚨 Sameer Rizvi told MS Dhoni to offer namaz 🚨
— Mufanlal Wohra (@ramgaming242) May 1, 2026
When Sameer Rizvi was in the CSK team, and MS Dhoni was suffering from knee pain, Rizvi suggested that Dhoni should offer namaz and his knee problem would get better. After hearing this, Dhoni got angry and Sameer Rizvi was removed… pic.twitter.com/tsH8dGOLvg
Meet Sameer Rizvi
— Hindutva Knight (@HPhobiaWatch) May 1, 2026
He is a cricketer from Uttar Pradesh. Played for Kanpur Superstars in UPLT20
He was picked by CSK in IPL
Last season Dhoni was going through knee injury
He told dhoni to read Namaz to heal his knee quickly. He told him to read certain kalma while offering… pic.twitter.com/4lKTvJIsI9
>Sameer Rizvi told dhoni to read Namaz to heal his knee pain quickly
— Courageous (@CourageousRo) May 2, 2026
>MS Dhoni benched Rizvi for the rest of the season and Kicked this J*hadi out of the team
Absolute chad behaviour from Thala 🗿🚩 pic.twitter.com/GJWz91zf4N
काय आहे या या दाव्यांचं वास्तव?
सध्या तरी हा दावा सोशल मीडियावर इकडे-तिकडे पसरवला जात आहे. याबाबतीत कोणाकडेही अधिकृत माहिती नाही. चेन्नई सुपर किंग्स, महेंद्र सिंग धोनी आणि समीर रिझवी यांच्याकडून अजूनपर्यंत कोणतही प्रत्यक्ष विधान समोर आलं नाही. जोपर्यंत अधिकृत विधान समोर येत नाही तोपर्यंत असे दावे खोटे आहेत असं मानलं जाईल.
सीएसके आणि समीर रिझवी
आयपीएल 2024 मध्ये ज्यावेळी ऑक्शन झालं त्यावेळी सीएसकेनं समीर रिझवी याला 8.40 करोड रूपयांना विकत घेतल होतं. दरम्यान समीर याला म्हणावी तशी कामगिरी संघासाठी करता आली नाही, ज्यामुळे त्याला संघातून एका हंगामानंतर रिलीज केलं होतं. समीरनं सीएसकेसाठी 8 सामन्यात 51 धावा केल्या होत्या.
त्यानंतर 2025 हंगामात झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं समीरला 95 लाख रूपये देऊन विकत घेतलं. सध्या तो यंदाच्या हंगामात (आयपीएल 2026) चांगलं प्रदर्शन करतानाही दिसत आहे.
आणखी हेही वाचा
भुवनेश्वर ‘असं’ करणारा पहिला भारतीय गोलंदाज-https://agcsport.tv/cricket/bhuvneshwar-becomes-the-first-indian-bowler-to-do-so/

