सीएसकेने केला मुंबईविरूद्ध मोठा रेकॉर्ड

IPL 2026 CSK vs MI: नुकताच चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात आयपीएलचा ३३वा सामना पार पडला. या सामन्यात चेन्नईनं मुंबईचा 103 धावांनी पराभव केला. हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर म्हणजे वानखेडे स्टेडियमवर झाला. तसेच याच सामन्यात चेन्नईनं मोठा रेकॉर्ड सुद्धा केला आहे.

मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्यानं (Hardik Pandya) नाणेेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण हा निर्णय सीएसकेच्या खेळाडूंनी पुर्णपणे चुकीचा ठरवला. सीएसकेनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 207 धावा केल्या. यात सगळ्यात जास्त धावा संजू सॅमसन (Sanju Samson) यानं केल्या. संजूनं 10 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीनं नाबाद शतकी (101*) खेळी केली. या शतकी खेळीनं त्यानं यंदाच्या हंगामात आपलं दुसरं शतक पुर्ण केलं आहे.

प्रत्युत्तरात उतरलेल्या मुंबईच्या संघाला सुरूवातीपासूनच फलंदाजीमध्ये संघर्ष करावा लागला. कारण सुरूवातीपासून विकेट्स पडत गेल्या. तिलक वर्मा (Tilak Varma) आणि सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनी थोडीशी धावांची गती वाढवली पण नंतर त्यांचीही विकेट गेली. त्यानंतर कोणत्याही फलंदाजांना चांगली खेळी करता आली नाही. परिणामी मुंबईला पुर्ण 20 षटक सुद्धा खेळता आलं नाही. त्यांचा संपुर्ण संघ 104 धावांवरच सर्वबाद (All Out) झाला.

काय रेकॉर्ड केला सीएसकेनं?
कालच्या पराभवानं चेन्नई सुपर किंग्सनं आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला सगळ्यात जास्त धावांनी पराभव करून रेकॉर्ड केला आहे. याआधी आयपीएलमध्ये मुंबईला सगळ्यात मोठा पराभव 87 धावांनी मिळाला होता, जो 2013 मध्ये राजस्थान रॉयल्सच्या (RR) विरूद्ध मिळाला होता. दरम्यान सीएसकेविरूद्ध याआधी सगळ्यात मोठा पराभव 48 धावांनी झाला होता पण कालच्या सामन्यात तब्बल 103 धावांनी पराभव मिळाला आहे. आणि हा पराभव मुंबईविरूद्ध एखाद्या संघानं केलेला सगळ्यात मोठा पराभव आहे.

तसेच सीएसकेसाठी हा सगळ्यात मोठा विजय आहे. याआधी सीएसकेनं 97 धावांनी विजय मिळवला होता, जो 2015 ला किंग्स 11 पंजाब (पंजाब किंग्स) विरूद्ध मिळवला होता.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.