सीएसकेचा जेमी ओव्हरटन दुखापतीमुळे परतला मायदेशी

Jamie Overton: आयपीएल 2026 च्या प्लेऑफ शर्यतीसाठी कसरत करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार गोलंदाज जेमी ओव्हरटन दुखापतीमुळे इंग्लंडला परतला आहे, त्यामुळे आगामी कोणत्याही सामन्यासाठी तो उपलब्ध नसेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

या हंगामात जेमीनं सीएसकेसाठी उत्तम प्रदर्शन केलं आहे. त्यानं 10 सामन्यांत 14 विकेट घेतल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्सनं सोशल मीडिया अकाउंट ‘एक्स’ वर ओव्हरटनच्या दुखापतीची अपडेट दिली आहे. त्यांनी सांगितलं की, “जेमी ओव्हरटनच्या मांडीला दुखापत झाली आहे आणि त्यामुळेच तो युके (इंग्लंड) ला परतला आहे”.

दरम्यान ओव्हरटन पुढच्या सामन्यात उपलब्ध नसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. जेमीनं सीएसकेसाठी शेवटचा सामना लखनऊ सुपर जायंट्सच्या विरूद्ध खेळला होता. त्यात त्यानं 4 षटकात 36 धावा देऊन 3 विकेट आपल्या नावावर केल्या होत्या. ओव्हरटननं या हंगामात 17.78 च्या सरासरीनं विकेट घेतल्या आहेत, तर त्याचा इकोनॉमी 8.89 आहे. गोलंदाजीसोबतच जेमीनं फलंदाजीमध्ये सुद्धा चागंली कामगिरी केली आहे. त्यानं 158 च्या स्ट्राईक रेटनं 136 धावा केल्या आहेत.

चेन्नई सुपर किंग्स संघाला खेळाडूंच्या दुखापतीमुळे संघर्षाचा सामना करावा लागला आहे. नुकताच (13 मे) दुखापतीमुळे आयपीएल 2026 मधून रामकृष्ण घोष बाहेर पडला आहे तर त्याच्या जागी कर्नाटकचा अष्टपैलू खेळाडू मैकनील नोरोन्हा याला संघात स्थान देण्यात आलं आहे.

सध्या सीएसकेचे 11 सामन्यात 12 गुण मिळवले आहेत. या 12 गुणांमुळे ते गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे, तर संघाचा पुढचा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरूद्ध शुक्रवारी खेळणार आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.