Abhishek Sharma IPL 2026: काल झालेल्या आयपीएल 2026 च्या सामन्यात सनराजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाली. या झालेल्या 31 व्या सामन्यात अभिषेक शर्मानं आक्रमक खेळी खेळून क्रिकेट जगतातील मोठ मोठ्या दिग्गज खेळाडूंना मागं टाकलं आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेमियनवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अभिषेक शर्मानं 68 चेंडूत 135 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्यानं 10 चौकार आणि 10 षटकार लावले आहे. या त्याच्या खेळीनं दिल्लीच्या गोलंदाजांची पुर्णपणे दाणादाण उडवली. त्यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 198 चा होता.
या जबरदस्त खेळीसोबत अभिषेक शर्मानं टी20 (T20 World Record) क्रिकेटमध्ये खूप मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. त्यानं टी20 फॉर्मेटमध्ये 4 वेळा 130 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि असं करणारा तो जगातील पहिला फलंदाज (First Player) बनला आहे. याबाबती अभिषेक शर्मानं ‘युनिवर्स बॉस’ क्रिस गेल आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅरॉन फिंच या दोघांना त्यानं मागं सोडल आहे. याआधी त्यांनी 3-3 वेळेस ही कामगिरी केली आहे.
या दोघांना तर अभिषेकनं मागं सोडलचं पण त्यानं आणखी एका मोठ्या दिग्गज खेळाडूची बरोबरी सुद्धा केली आहे. टी20 क्रिकेटमध्ये सगळ्यात भारतासाठी सगळ्यात जास्त शतक लावण्याच्या बाबतीत विराट कोहलीची बरोबरी केली आहे. आता या दोघांच्या नावावर 9-9 शतक आहेत.
अभिषेक शर्मानं काल खेळलेल्या खेळीनं टी20 क्रिकेटमध्ये 350 षटकार पुर्ण केले आहेत. तसेच आयपीएलमध्ये दुसऱ्यांचा असं झालं आहे की, अभिषेक शर्मानं 130 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. याआधी त्यानं 2025 मध्ये पंजाब किंग्सच्या विरूद्ध 141 धावा मारल्या होत्या.

