भारतासाठी ‘Do or Die’ची लढत! आज विजय अनिवार्य

IND W vs SA W T20: भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेचा थरार आता जोहान्सबर्गमध्ये पोहोचला आहे. आज ( बुधवार, 22 एप्रिल 2026) मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना ऐतिहासिक ‘द वँडरर्स स्टेडियम’वर खेळवला जाणार आहे. सलग दोन पराभवांमुळे बॅकफूटवर गेलेल्या भारतीय संघासाठी आजचा सामना मालिका वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर झालं नाही तर भारतीय संघ ही मालिका गमावून बसेल.

दक्षिण आफ्रिकेची 2-0 ने आघाडी
मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत यजमान दक्षिण आफ्रिकेनं आपला दबदबा कायम राखला आहे. डर्बनमध्ये झालेले पहिले दोन्ही सामने जिंकून दक्षिण आफ्रिकेनं मालिकेत 2-0 अशी भक्कम आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात शफाली वर्माच्या अर्धशतकी खेळीनंतरही भारतीय गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना रोखण्यात अपयश आलं होतं. आज जर भारताचा पराभव झाला, तर दक्षिण आफ्रिका दोन सामने शिल्लक असतानाच ही मालिका खिशात टाकेल.

वँडरर्सची खेळपट्टी ही वेगवान आणि फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते. अशा परिस्थितीत स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा या सलामी जोडीला मोठी धावसंख्या उभारावी लागेल. गोलंदाजीत रेणुका सिंह ठाकूर आणि दीप्ती शर्मा यांच्यावर दक्षिण आफ्रिकेची फलंदाजींची फळी कशी तोडून ठेवता येईल याची मोठी जबाबदारी असेल.

दोन्ही महिला संघांची संभाव्य प्लेइंग 11

भारत: स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, राधा यादव, रेणुका सिंह ठाकूर, अरुंधती रेड्डी.

दक्षिण आफ्रिका: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, सुने लुस, ॲनेके बॉश, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, अनेरी डेर्कसन, सिनालो जाफ्ता, अयाबोंगा खाका, तुमी सेखुखुने, नॉनकुलुलेको म्लाबा.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.