आगामी FIH Hockey World Cup 2026 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय संघाच्या सामन्यांकडे चाहत्यांचे विशेष लक्ष लागले आहे. हा विश्वचषक 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2026 दरम्यान बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे खेळवला जाणार आहे. या विश्वचषकात पुरूष आणि महिला यांच्यात एकूण 16 संघ खेळणार आहेत.
FIH Hockey World Cup 2026: भारतीय पुरूष हॉकी संघाचा पहिला सामना(15 ऑगस्ट) Wales या संघाविरूद्ध होणार आहे. हा सामना Amstelveen (NED) या स्टेडियनवर खेळवला जाणार आहे. तसेच पुढील दोन्ही सामने याच स्टेडियमवर खेळवले जाणार आहे. 17 ऑगस्टला इंग्लंडविरूद्ध खेळणार आहे. आणि शेवटचा तिसरा सामना हा भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरूद्ध (19 ऑगस्टला) खेळणार आहे.
तर दुसरीकडे भारतीय महिला हॉकी संघाचे सुद्धा तिन्ही सामने त्याच स्टेडियमवर (Amstelveen (NED)) खेळवले जातील. FIH Hockey World Cup 2026 चा पहिला सामना रविवारी (16 ऑगस्ट) चीन विरूद्ध खेळणार आहे. दुसरा सामना 18 ऑगस्टला दक्षिण आफ्रिका विरूद्ध खेळणार आहे. तर शेवटचा आणि तिसरा सामना 20 ऑगस्टला इंग्लंड विरूद्ध खेळणार आहे.
हे सगळे सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 ला खेळतील. त्यामुळे भारतीय चाहत्यांना हे सगळे सामने पहायला मिळतील.
दरम्यान, मुख्य विश्वचषकात गट फेरी संपल्यानंतर उपांत्यपूर्व (Quarterfinal), उपांत्य (Semifinal) आणि अंतिम सामना (Final) अशा टप्प्यांमध्ये स्पर्धा पुढे जाईल.
भारताचा विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याची सर्वाधिक चर्चेत सुरू आहे.
एकूणच, 2026 चा हॉकी विश्वचषक हा भारतीय संघासाठी मोठी संधी मानली जात आहे. अलीकडील कामगिरी पाहता भारताकडून यंदा पदकाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे, आणि चाहत्यांचे लक्ष आता या महत्त्वाच्या स्पर्धेकडे लागले आहे.

