भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वात आक्रमक फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखली जाणारी खेळाडू म्हणजे स्मृती मंधाना (Smriti Mandhana). डावखुरी फलंदाज असलेल्या स्मृती त्यांच्या सुंदर फलंदाजी शैली, उत्कृष्ट टाइमिंग आणि सातत्यपूर्ण धावांसाठी प्रसिद्ध आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी अनेक विक्रम केले असून त्या भारतीय महिला क्रिकेट संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहेत. फक्त भारतातच नाही तर क्रिकेट जगतात त्यांनी आपली मोठी ओळख निर्माण केली आहे. तसेच भारतीय महिला संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यात(२०२५) सगळ्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या खेळाडूंपैकी एक असलेल्या.
सुरूवातीचं जीवन:
स्मृती मंधाना यांचा जन्म १८ जुलै १९९६ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे बालपण सांगली येथे गेले. त्यांच्या कुटुंबात आधीपासून क्रिकेटचा प्रभाव होता. त्यांच्या भावामुळे त्यांना क्रिकेटची प्रेरणा मिळाली आणि लहानपणापासूनच त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. स्थानिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत त्यांनी लवकरच आपली ओळख निर्माण केली.
आंतरराष्ट्रीय पदार्पण:
स्मृती मंधाना यांनी २०१३ साली भारतीय महिला क्रिकेट राष्ट्रीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांनी पहिला एकदिवसीय सामना बांग्लादेशा महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळला. त्यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे त्या लवकरच भारतीय संघातील प्रमुख सलामीवीर बनल्या.
कारकिर्द आणि विक्रम:
स्मृती मंधाना यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या कामगिरी केल्या आहेत.
- आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०१७ मध्ये भारताच्या उत्कृष्ट कामगिरीत महत्त्वाची भूमिका.
- आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२० मध्ये भारताच्या संघातील प्रमुख फलंदाज.
- आयसीसी महिला वनडे क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये महत्त्वाची भूमिका.
- महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० पेक्षा जास्त धावा आणि अनेक शतके.
- जगातील सर्वोत्कृष्ट महिला फलंदाजांपैकी एक म्हणून ओळख.
नेतृत्व आणि शैली :
स्मृती मंधाना या आक्रमक आणि आकर्षक फलंदाजी शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कव्हर ड्राइव्ह आणि टाइमिंगमुळे त्या प्रेक्षकांच्या आवडत्या खेळाडूंमध्ये गणल्या जातात. त्या भारतीय संघाच्या उपकर्णधार म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत आणि संघातील युवा खेळाडूंना प्रेरणा देतात. तसेच मंधानाने डब्लूपीएलमध्ये आरसीबी संघाचं नेतृत्त्व करत असताना अनेक वेळा संघाला विजेता केलं आहे.
पुरस्कार आणि सन्मान
स्मृती मंधाना यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत.
- २०१८ त्यांना अर्जुन अवार्ड देण्यात आला.
- आयसीसी कडून ‘आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द इयर’ – २०१८
- आयसीसी कडून ‘आयसीसी महिला वनडे क्रिकेटर ऑफ द इयर’ – २०१८, २०२१ आणि २०२४
- जगातील सर्वोत्तम महिला फलंदाजांपैकी एक म्हणून ओळख
स्मृती मंधाना यांचा पदार्पण आणि शेवटचा सामना
आंतरराष्ट्रीय
कसोटी(महिला)
पदार्पण– भारत विरूद्ध इंग्लंड, वॉर्मस्ली- ऑगस्ट १३-१६, २०१४
शेवटचा सामना– भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया- मार्च ०६-०८, २०२६
एकदिवसीय सामना(महिला)
पदार्पण– भारत विरूद्ध बांग्लादेश, अहमदाबाद- एप्रिल १०, २०१३
शेवटचा सामना– भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया, होबार्ट- मार्च ०१, २०२६
टी२०आय(महिला)
पदार्पण– भारत विरूद्ध बांग्लादेश, वडोदरा- एप्रिल ०५, २०१३
शेवटचा सामना– भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया, अॅडलेड- फेब्रुवारी २१, २०२६
डब्लूपीएल
पदार्पण– रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स, मुंबई- मार्च ५, २०२३
शेवटचा सामना– रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स, वडोदरा- फेब्रुवारी ५, २०२६
निष्कर्ष
स्मृती मंधाना या भारतीय महिला क्रिकेटमधील अत्यंत प्रतिभावान आणि प्रेरणादायी खेळाडू आहेत. त्यांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे त्यांनी भारतीय महिला क्रिकेटला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख मिळवून दिली आहे. त्यामुळे भारतीय क्रीडा इतिहासात त्यांचे नाव अभिमानाने घेतले जाते. तसेच सध्या त्या भारतीय महिला क्रिकेटमध्ये अजूनही अस्तित्त्वात आहेत.
| Full Name | स्मृती मंधाना |
| Sport | Cricket |
| Country | India |
| Gender | Female |
| Playing Role | डावखुरी फलंदाज |
| Date of Birth | 18/07/1996 |
| Total Matches | |
| Highest Score | |
| Total Career Score | |
| Latest Match | |
| Awards |

