रोहित शर्मा

    0
    19
    Rohit Sharma is considered one of the most talented and aggressive batsmen in Indian cricket as well as one of the most successful captains. He is known as the 'Hitman' in the cricket world.
    rohit sharma biography

    भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रतिभावान आणि आक्रमक फलंदाजांपैकी एक तसेच यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून Rohit Sharma यांचे नाव घेतले जाते. त्यांची आकर्षक फलंदाजी शैली, मोठी शतके, मैदानावर टिकून राहण्याची क्षमता आणि उत्कृष्ट नेतृत्व यामुळे त्यांनी क्रिकेट जगतात आपली मोठी ओळख निर्माण केली आहे. तसेच त्यांना क्रिकेट जगतात ‘हिटमॅन’ (Hitman) या नावाने देखील ओळखलं जातं. 2007 च्या आयसीसी टी२० विश्वचषक ट्रॉफी आणि 2013 च्या चॅम्पियन ट्रॉफी जिंकली त्यावेळी सुद्धा संघाचे भाग होते.

    सुरूवातीचं जीवन

    रोहित गुरूनाथ शर्मा (Rohit Sharma) यांचा जन्म ३० एप्रिल १९८७ रोजी नागपुर येथे झाला. त्यांचे बालपण प्रामुख्याने मुंबई येथे गेले. लहानपणापासूनच त्यांना क्रिकेटची आवड होती. स्थानिक स्पर्धांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि पुढे त्यांची निवड मुंबई क्रिकेट संघामध्ये झाली.

    आंतरराष्ट्रीय पदार्पण:

    Rohit Sharma (Hitman) यांनी 2007 साली भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांनी पहिला एकदिवसीय सामना आयर्लंड क्रिकेट संघाविरूद्ध खेळला. सुरुवातीला त्यांना मधल्या फळीत खेळण्याची संधी मिळाली, पण नंतर सलामीवीर म्हणून खेळताना त्यांनी अनेक मोठे विक्रम रचले आहेत.

    विक्रम:

    रोहित शर्मा यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक ऐतिहासिक विक्रम केले आहेत.

    • एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके करणारे जगातील एकमेव फलंदाज.
    • २०१४ मध्ये श्रीलंका संघाविरूद्ध २६४ धावांचा विक्रमात्मक खेळी.
    • आयसीसी क्रिकेट विश्वचशक २०१९ मध्ये ५ शतके करणारे पहिले खेळाडू.
    • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०,००० पेक्षा जास्त धावा आणि अनेक शतके.

    नेतृत्व आणि शैली:

    रोहित शर्मा हे अत्यंत शांत आणि रणनीतीपूर्ण नेतृत्वासाठी ओळखले जातात. त्यांनी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला ५ किताब जिंकून दिले. यांच्याच नेतृत्त्वात भारतीय संघाने आयसीसी टी२० विश्वचषक(२०२४) जिंकला. त्यांची फलंदाजी शैली आकर्षक आणि आक्रमक आहे. विशेषतः पुल शॉट आणि टाइमिंगसाठी ते प्रसिद्ध आहेत.

    पुरस्कार आणि सन्मान:

    रोहित शर्मा यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत.

    • 2015मध्ये त्यांना अर्जुन अवार्ड मिळाला
    • 2020 मध्ये राजीव गांधी खेलरत्न अवार्ड
    • ICC वनडे प्लेअर ऑफ द इयर – 2019
    • IPL मधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक

    रोहित शर्मा यांचा पदार्पण आणि शेवटचा सामना:
    आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण– भारत विरूद्ध वेस्टइंडिज, ईडन गार्डन- नोव्हेंबर ०६-०८, २०१३
    शेवटचा सामना– भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न- डिसेंबर २६-३०, २०२४

    एकदिवसीय सामना:
    पदार्पण– भारत विरूद्ध आयर्लंड, बेलफास्ट- जुन २३, २००७
    शेवटचा सामना– भारत विरूद्ध न्यूझीलंड, इंदोर – जानेवारी १८, २०२६

    T20I:
    पदार्पण
    – भारत विरूद्ध इंग्लंड, डर्बन- सप्टेंबर १९, २००७
    शेवटचा सामना– भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका, ब्रिजटाऊन- जुन २९, २०२४

    IPL:
    पदार्पण– डेक्कन चार्जर्स विरूद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स, कोलकत्ता- एप्रिल २०, २००८
    शेवटचा सामना– मुंबई इंडियन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई- एप्रिल १२, २०२६

    निष्कर्ष:
    Rohit Sharma हे भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय खेळाडूंमध्ये गणले जातात. त्यांच्या आक्रमक फलंदाजी, मोठ्या विक्रमांमुळे आणि उत्कृष्ट नेतृत्वामुळे त्यांनी भारतीय क्रिकेटला नवी उंची दिली आहे. त्यामुळे क्रिकेट जगतात त्यांचे नाव नेहमी अभिमानाने घेतले जाते.

    Player Biography
    Full NameRohit Gurunath Sharma
    SportCricket
    CountryIndia
    Gendermale
    Playing RoleRight-handed opening batsman
    Date of Birth30/04/1987
    Total Matches
    Highest Score
    Total Career Score
    Latest Match
    Awards
    Previous articleस्मृती मंधाना
    Next articleललियानझुआला छांगते
    Akash_Sonawane
    AGC Sports मध्ये काम करताना त्या कथा शब्दांत मांडण्याचा प्रयत्न. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी आणि जगभरातील क्रीडा घडामोडींचा अभ्यास. खेळाडूंच्या प्रवासापासून ते विक्रमांपर्यंत – प्रत्येक गोष्ट सांगण्याची आवड. सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापिठाच्या रानडे विभागातून मास कम्युनिकेशन ॲंड जर्नलिझनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना मल्टिमीडिया आशयात विशेषत: प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया तसेच स्क्रिप्ट रायटिंग आणि वेब पत्रकारिया यात प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळाला. AGC Sports मध्ये क्रिडा बीट पाहत असताना अनेक गोष्टी विशेषत: क्रिकेट, फुटबॉल, हॉकी यांसारख्या खेळांची माहिती. तसेच गावपातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत माहिती, अचूक, विश्वसनीय आणि वाचकांना लगेच समजेल अशा सोप्या भाषेत देण्यावर माझा प्रयत्न आहे.