यशस्विनी घोरपडेने मिळवले पहिले विजेतेपद

Senior National Champion: कर्नाटकच्या 21 वर्षीय यशस्विनी घोरपडेनं (Yashaswini Ghorpade) महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अत्यंत रोमहर्षक विजय मिळवत पहिल्यांदाच ‘सीनियर नॅशनल चॅम्पियन’ (Senior National Champion) होण्याचा मान पटकावला आहे. इंदोरमधील अभय प्रशाल इनडोअर स्टेडियमवर शनिवारी (21 मार्च) पार पडलेल्या या अंतिम सामन्यात यशस्विनीनं पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाच्या (PSPB) सिंध्रेला दासचा पराभव केला.

कोण आहे ही खेळाडू आणि तिची कामगिरी?
यशस्विनी घोरपडे ही मूळची बेंगळुरूची असून ती भारताची अव्वल दर्जाची टेबल टेनिसपटूपैकी एक आहे. तिने वयाच्या 8 व्या वर्षी टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली होती. ज्युनियर स्तरावर तिने जागतिक क्रमवारीत 5 व्या स्थानापर्यंत मजल मारली होती.

तिने कसा विजय मिळवला
अंतिम सामना अत्यंत चुरशीचा ठरला, जो तब्बल सात सेटपर्यंत (Best of 7) ताणला गेला. यशस्विनीनं हा सामना 4-3 (11-6, 12-14, 11-5, 9-11, 13-11, 6-11, 11-8) असा जिंकला. शेवटच्या निर्णायक सेटमध्ये यशस्विनीनं आपल्या अनुभवाचा आणि संयमाचा वापर करत 11-8 नं बाजी मारली आणि जेतेपदावर शिक्कामोर्तब केला.

सीनियर स्तरावरील हे तिचे पहिलं एकेरी राष्ट्रीय सुवर्णपदक आहे. यापूर्वी तिनं कनिष्ठ (U-15 आणि U-19) राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत अनेक सुवर्णपदके जिंकली आहेत.

कोचविषयी काय बोलली?
यशस्विनीनं हा विजय तिचे दीर्घकाळाचं प्रशिक्षक अंशुमन रॉय (Anshuman Roy) यांना समर्पित केला, जे गेल्या 15 वर्षांपासून तिला मार्गदर्शन करत आहेत. विशेष म्हणजे, ज्या दिवशी यशस्विनीनं हे जेतेपद पटकावलं, त्याच दिवशी अंशुमन रॉय यांचा वाढदिवस होता. आणि हा सामना जिंकून तिनं तिच्या कोचला खास वाढदिवसाच गिफ्ट दिलं आहे.
यशस्विनी भावूक होत म्हणाली, “स्पर्धेच्या दडपणामुळे मी सरांचा वाढदिवस पूर्णपणे विसरले होते. जेव्हा त्यांनी मला मिठी मारली आणि ‘थँक्स फॉर द बेस्ट बर्थडे गिफ्ट’ असे म्हटले, तेव्हाच मला याची जाणीव झाली. ही माझ्याकडून त्यांना दिलेली सर्वोत्तम भेट आहे”.

या विजयानंतर यशस्विनी आता जागतिक क्रमवारीत पहिल्या 75 मध्ये स्थान मिळवण्यासाठी आणि 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या तयारीसाठी सज्ज झाली आहे

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.