श्रेयस अय्यरने आयपीएल पुर्वी केले मोठे विधान

Shreyas Iyer IPL 2026: Punjab Kingsचा कर्णधार Shreyas Iyer हा आयपीएल हंगामाच्या आधीच एका विधानामुळे चर्चेत आला आहे. नव्या हंगामासाठी संघाच्या जर्सी अनावरण सोहळ्यात अय्यरने आत्मविश्वासपूर्ण भूमिका मांडत स्पष्ट संकेत दिले आहेत. यंदा पंजाब किंग्स फक्त खेळायला नाही, तर ट्रॉफी जिंकण्यासाठीच मैदानात उतरणार आहे.

जर्सी लाँच कार्यक्रमात बोलताना अय्यर म्हणाला की, “अपेक्षा खूप आहेत आणि आम्ही त्या पूर्ण करण्यासाठी तयार आहोत. माझं लक्ष फक्त ट्रॉफीवर आहे. मैदानात उतरलो की 100 टक्के देणार.” त्याने संघातील वातावरणावर बोलताना सांगितले की, “आम्ही एक कुटुंब म्हणून खेळतो. मैदानाबाहेरची एकजूट हीच मैदानावरच्या यशाची गुरुकिल्ली असते.”

गतवर्षी त्याने काय कामगिरी केली.
अय्यरने कर्णधार आणि फलंदाज म्हणून मागील हंगामात जबरदस्त कामगिरी केली होती. अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सने तब्बल ११ वर्षांनंतर प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला आणि इतिहासात दुसऱ्यांदा फायनल गाठली होती. जरी अंतिम सामन्यात पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला, तरी अय्यरचे नेतृत्व आणि शांत स्वभाव संघासाठी मोठा सकारात्मक मुद्दा ठरला. IPL 2025 मध्ये त्याने पंजाब किंग्ससाठी धावांचा पाऊस सुद्धा पाडला होता.

दरम्यान, दुखापतीमुळे काही काळ मैदानाबाहेर राहिल्यानंतर अय्यर आता पूर्णपणे फिट झाला आहे. त्यामुळे IPL 2026 मध्ये त्याच्याकडून पुन्हा एकदा मोठ्या खेळींची अपेक्षा आहे. यंदा त्याच्यासमोर फक्त फलंदाजीच नव्हे, तर संघाला पहिलं IPL विजेतेपद मिळवून देण्याचं मोठं आव्हान आहे.

पंजाब किंग्सने यंदा संघात काही महत्त्वाचे बदल करत युवा आणि अनुभवी खेळाडूंचं संतुलन राखण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संघ अधिक मजबूत आणि स्पर्धात्मक दिसून येत आहे.

पहिला सामना कोणाविरूद्ध होणार आहे?
IPL 2026 मध्ये Punjab Kingsचा पहिला सामना Gujarat Titansविरुद्ध होणार आहे. हा सामना 31 मार्च 2026 रोजी खेळवला जाणार असून हंगामाच्या सुरुवातीलाच पंजाब किंग्ससमोर मोठं आव्हान असेल.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.