CSK चा डेथ ऑवर्स स्पेशल ‘नेथन इलिस’ यंदाच्या IPL ला मुकणार

IPL 2026: IPL 2026 सुरू होण्यापूर्वीच Chennai Super Kings संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाने लिलावात विकत घेतलेला वेगवान गोलंदाज Nathan Ellis यंदाच्या हंगामात खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

ऑस्ट्रेलियाचा हा अनुभवी टी-20 गोलंदाज दुखापतीमुळे IPL 2026 मधून बाहेर पडला आहे. फिटनेस समस्या, स्नायूला दुखापत आणि पुनर्वसन प्रक्रियेचा कालावधी वाढल्यामुळे त्याला पूर्ण हंगामातून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे CSK च्या बॉलिंग लाइनअपवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

नेथन इलिस सीएलकेसाठी का महत्त्वाचा होता?
नेथन इलिस हा ऑस्ट्रेलियाचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-20 फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये अचूक यॉर्कर टाकण्याची त्याची क्षमता ही त्याची मोठी ताकद मानली जाते. तसेच यंदाच्या लिलावात सीएसकेचे अनेक वेगवान गोलंदाज इतर संघांने विकत घेतले. यामुळेच तो (नेथन इलिस) सीएसकेसाठी न खेळण ही मोठी हाणी संघासाठी आहे.

त्याला किती रूपयांना विकत घेतलं?
IPL च्या लिलावात CSK ने त्याला सुमारे ₹2 कोटींना आपल्या संघात सामील करून घेतले होते. संघ व्यवस्थापनाला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र दुखापतीमुळे तो संपूर्ण हंगाम गमावणार आहे.

तो परत येण्याची शक्यता सध्या कमी मानली जात आहे. कारण त्याची दुखापत गंभीर असल्याचे समजते आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डही त्याच्या फिटनेसबाबत कोणताही धोका पत्करणार नाही. त्यामुळे IPL दरम्यान त्याचे पुनरागमन होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

नेथन इलिसच्या जागी CSK ला पर्यायी खेळाडू कोण असतील?
आता प्रश्न असा आहे की, त्याच्या जागी CSK कोणाला संधी देणार? भारतील अनेक खेळाडू आधीच सीएसकेच्या ताफ्यात आहेत. त्यामुळे CSK सध्या उपलब्ध असलेल्या खेळाडूंमध्ये अफगाणिस्तानचा फझलहक फारूकी, दक्षिण आफ्रिकेचा जेराल्ड कोएत्झी किंवा ऑस्ट्रेलियाचा सीन ॲबॉट यांच्यापैकी एकाला संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.

CSK चा पहिला सामना (30 मार्च 2026) Rajsthan Royals विरुद्ध होणार आहे, जो हंगामातील सर्वात मोठ्या सामन्यांपैकी एक मानला जातो. या सामन्यात CSK ला इलिसच्या अनुपस्थितीची कमतरता जाणवू शकते.

दुसरीकडे, राजस्थान रॉयल्ससाठीही हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. दोन्ही संघ हंगामाची सुरुवात विजयाने करण्याच्या प्रयत्नात असतील, त्यामुळे हा सामना अत्यंत रोमांचक होण्याची शक्यता आहे.

नेथन इलिसच्या अनुपस्थितीमुळे CSK च्या योजनांमध्ये मोठा बदल झाला आहे. मात्र, या संघाचा अनुभव, MS Dhoni चा अनुभव आणि बेंच स्ट्रेंथ पाहता ते या आव्हानावर मात करण्यास सक्षम राहतील. आता इलिसच्या जागी कोण संधी साधतो आणि CSK ची बॉलिंग कितपत प्रभावी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.