F1 2026: नुकत्याच पार पडलेल्या फॉर्म्युला वनमध्ये जगाला रविवारी(15 मार्च) एक नवा सुपरस्टार मिळाला! अवघ्या १९ वर्षांच्या किमी अँटोनेली (Kimi Antonelli) याने शांघाय इंटरनॅशनल सर्किटवर झालेल्या चायनीज ग्रँड प्रिक्समध्ये विजय मिळवून इतिहास रचला आहे. मर्सिडीज (Mercedes) संघाकडून खेळणाऱ्या या तरुण इटालियन खेळाडूचा हा पहिलाच एफ १ विजय (Maiden Victory) आहे.
ही रेस 15 मार्च 2026 रोजी पार पडली असून ती या हंगामातील दुसरी रेस आहे. फक्त 19 वर्षांचा असलेला अँटोनेली इतक्या कमी वयात ग्रँड प्रिक्स जिंकणाऱ्या ड्रायव्हर्समध्ये आपले नाव कोरले आहे. हा त्याचा पहिलाच विजय असल्याने त्याच्यासाठी आणि त्याच्या टीमसाठी हा क्षण ऐतिहासिक ठरला.
रेसची सुरुवातच अँटोनेलीसाठी शानदार झाली. त्याने पोल पोजिशनवरून सुरुवात करत पहिल्याच लॅपपासून आघाडी घेतली आणि संपूर्ण शर्यतीत ती कायम राखली. अचूक ड्रायव्हिंग, उत्तम टायर मॅनेजमेंट आणि योग्य रणनीतीच्या जोरावर त्याने प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत विजय निश्चित केला.
या स्पर्धेत कोण- कोणत्या स्थानावर राहिले?
या शर्यतीत (F1) दुसऱ्या स्थानावर George Russell तर तिसऱ्या स्थानावर Lewis Hamilton राहिला. दोन्ही अनुभवी ड्रायव्हर्सनी शेवटपर्यंत चांगली लढत दिली, मात्र अँटोनेलीच्या वेगाशी ते स्पर्धा करू शकले नाहीत.
ही 2026 च्या Formula 1 हंगामातील महत्त्वाची शर्यत असून या विजयामुळे अँटोनेलीकडे आता भविष्यातील स्टार म्हणून पाहिलं जात आहे. त्याच्या या कामगिरीमुळे चॅम्पियनशिपची लढत अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे.
रेस जिंकल्यानंतर अँटोने काय म्हणाला?
रेस जिंकल्यानंतर अँटोनेलीने आनंद व्यक्त करत सांगितले, “हा माझ्यासाठी अविश्वसनीय क्षण आहे. मी यासाठी खूप मेहनत घेतली आहे. टीमने मला उत्कृष्ट कार दिली आणि मी प्रत्येक लॅपमध्ये माझे सर्वोत्तम दिले. हा विजय मी कधीच विसरणार नाही.” त्याने पुढे सांगितले की, हा फक्त सुरुवात आहे आणि पुढील शर्यतींमध्येही तो अशीच कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आणखी एक F1 स्पर्धा जिंकण्याची त्याची तयारी आहे.
या विजयानंतर Formula 1 जगतात नव्या युगाची सुरुवात झाल्याची चर्चा रंगली आहे. अनुभवी ड्रायव्हर्ससाठी हा इशारा मानला जात असून तरुण खेळाडू आता मोठ्या मंचावर आपली छाप सोडू लागले आहेत.
आता पुढील शर्यत Japanese Grand Prixमध्ये होणार आहे, जी प्रसिद्ध सुझुका सर्किटवर पार पडेल. या शर्यतीत अँटोनेली आपली विजयी मालिका कायम ठेवतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Chinese Grand Prix 2026 ही शर्यत एका नव्या स्टारच्या उदयाची साक्षीदार ठरली असून किमी अँटोनेलीने आपल्या पहिल्याच विजयाने इतिहास रचला आहे.

