इशान किशन कर्णधार तर अभिषेक उपकर्णधार!

IPL 2026: IPL 2026 आधी Sunrisers Hyderabad संघात मोठा बदल पाहायला मिळाला असून Ishan Kishan याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर Abhishek Sharma याला उपकर्णधार करण्यात आले आहे. या निर्णयामागचे कारण आता समोर आले असून चाहत्यांमध्ये याबाबत मोठी चर्चा रंगली आहे.

प्रत्यक्षात पाहिल्यास, सनरायझर्स हैदराबादचा मूळ कर्णधार Pat Cummins हाच आहे. मात्र तो सध्या दुखापतीमुळे IPL 2026 मधील सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने तात्पुरत्या स्वरूपात नवीन नेतृत्वाची घोषणा केली.

याच कारणामुळे इशान किशनला “स्टँड-इन कॅप्टन” म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. म्हणजेच, कमिन्स संघात परतल्यानंतर पुन्हा कर्णधारपद त्याच्याकडे जाणार असल्याच निदर्शनास येत आहे.

इशान किशनला का कर्णधार करण्यात आलं?
इशान किशनलाच कर्णधार का करण्यात आलं आहे. पण यामागेही काही कारण आहेत. त्याचा आंतरराष्ट्रीय अनुभव, विकेटकीपर म्हणून मैदानावरील नियंत्रण आणि दबावाच्या परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता ही त्याची मोठी ताकद मानली जाते. याशिवाय, त्याने अलीकडेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंड संघाला किताब जिंकून दिला आहे, ज्यामुळे त्याच्या नेतृत्वगुणांवर विश्वास वाढला आहे.

दुसरीकडे, अभिषेक शर्मा हा संघातील सातत्यपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू असल्याने त्याला उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. संघ व्यवस्थापन भविष्यातील नेतृत्वासाठी त्याला तयार करत असल्याचेही मानलं जात आहे.

दरम्यान, IPL 2026 मधील सनरायझर्स हैदराबादचा पहिला सामना 28 मार्च रोजी Royal Challengers Bengaluru विरुद्ध होणार आहे. हा सामना बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

या सामन्यात इशान किशन कर्णधार म्हणून पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे, तर अभिषेक शर्मा उपकर्णधार म्हणून महत्त्वाची भूमिका निभावेल. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचाही हा हंगामातील पहिलाच सामना असल्याने दोन्ही संघ जोरदार सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असतील.

हा निर्णय तात्पुरता असला तरी सनरायझर्स हैदराबादसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. इशान किशनच्या नेतृत्वाखाली संघ कसा खेळतो, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. तसेच, कमिन्सच्या पुनरागमनानंतर संघातील नेतृत्वाची समीकरणे कशी बदलतात, हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.