UEFA Champions League 2026: काल(18 मार्च) FC Barcelona आणि Newcastle United यांच्यात UEFA Champions Leagueच्या राऊंड ऑफ 16 च्या दुसऱ्या लेगमध्ये अत्यंत एकतर्फी सामना पाहायला मिळाला. या सामन्यात बार्सिलोनाने न्यूकॅसलवर तब्बल 7-2 असा दणदणीत विजय मिळवत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
सामन्याची सुरुवात अत्यंत वेगाने झाली होती. बार्सिलोनासाठी राफिन्हाने सुरुवातीला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र न्यूकॅसलनेही जोरदार प्रत्युत्तर देत अँथनी एलांगा याने दोन गोल करत सामना 2-2 असा बरोबरीत आणला. त्यानंतर मार्क बर्नालने गोल करत बार्सिलोनाला पुन्हा आघाडी दिली. पहिल्या हाफच्या शेवटी लॅमिन यामालने पेनल्टीवर गोल करत सामना बार्सिलोनाच्या बाजूने झुकवला.
दुसऱ्या हाफमध्ये मात्र बार्सिलोनाने पूर्ण वर्चस्व गाजवले. फर्मिन लोपेझ, रॉबर्ट लेवानडोव्स्की (2 गोल) आणि पुन्हा राफिन्हाने गोल करत न्यूकॅसलचा पूर्णपणे पराभव केला. विशेष म्हणजे, बार्सिलोनाने आक्रमक फुटबॉलचे शानदार प्रदर्शन करत दुसऱ्या हाफमध्ये सलग गोलांचा पाऊस पाडला.
या सामन्याआधी पहिल्या लेगमध्ये दोन्ही संघांमध्ये 1-1 अशी बरोबरी झाली होती, जिथे बार्सिलोनासाठी लॅमिन यामालने शेवटच्या क्षणी पेनल्टीवर गोल केला होता.
या हंगामात बार्सिलोनाने चॅम्पियन्स लीगमध्ये आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांनी ५ विजय, १ ड्रॉ आणि २ पराभव पत्करले आहे. पण काल झालेल्या सामन्यात त्यांनी दमदार कामगिरी करत क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवले आहे.
पॉइंट्स टेबलच्या दृष्टीने पाहिल्यास, लीग फेजनंतर बार्सिलोना पुढील फेरीत पोहोचला होता, तर न्यूकॅसलची कामगिरी मर्यादित राहिली आणि या कालच्या पराभवानंतर त्यांचा स्पर्धेतील प्रवास संपला आहे.
बार्सिलोनाचा पुढील सामना कोणाविरूद्ध?
आता पुढील फेरीत बार्सिलोना क्वार्टर फायनलमध्ये Atletico Madrid किंवा Tottenham Hotspur यांच्याविरुद्ध खेळणार आहे. दुसरीकडे, न्यूकॅसल आता युरोपियन स्पर्धेतून बाहेर पडल्याने त्यांचे लक्ष देशांतर्गत स्पर्धांकडे वळेल.

