संजू सॅमनमने सांगितलं राजस्थान रॉयल्स सोडण्या मागचं कारण…

IPL 2026: राजस्थान रॉयल्सचा खेळाडू आता आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्स या संघासाठी खेळणार आहे. केरळचा हा खेळाडू आयपीएल लिलाव होण्याआधीच एका ट्रेडमध्ये राजस्थान रॉयल्समधून चेन्नईमध्ये सहभागी झाला होता. २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सला सोडून सीएसकेत सहभागी होताना चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यातच आता संजू सॅमनमने शेवटी राजस्थान रॉयल्स सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे.

सॅमसन हा गेली अनेक वर्ष राजस्थान रॉयल्ससाठी खेळला आहे. तो राजस्थान रॉयल्सचा अनेक वर्ष कर्णधारही राहिला होता. तसेच त्याने या संघासाठी धावांचाही पाऊस पाडला आहे. पण त्याने शेवटी या संघातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. आणि चेन्नई सुपर किंग्स या संघाला निवडलं.

सॅमसन राजस्थानमधून का पडला बाहेर?

दिलेल्या एका मुलाखतीत त्याने राजस्थान रॉयल्स हा संघ का सोडला आहेे, याच मुळ कारण सांगितलं आहे. तो म्हणतो की, “मी राजस्थान रॉयल्स सोडलं कारण मला वाटलं होतं की, आता या संघासाठी खेळण्याचा वेळ समाप्त झाला आहे.” म्हणजेच की, माझा या संघासाठीचा काळ संपला आहे. त्यामुळे संजू सॅमसनने हा निर्णय घेतला. यंदा तो सीएसकेच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे.

राजस्थानसाठी सॅमसन किती वर्ष खेळला
संजू सॅमसन राजस्थान रॉयल्ससाठी एकुण ११ वर्ष खेळला आहे. तसेच तो एक राजस्थानचा अनुभवी खेळाडू आणि राजस्थान या फ्रेंचाइजीसाठी सर्वाधिक धावा करणारा हाच खेळाडू आहे. तो २०१३ ते २०२५ पर्यंत याच संघासाठी खेळला. पण २०१६-१७ हा हंगाम तो दिल्ली कॅपिटल्स (दिल्ली डेअरडेविल्स) संघाकडून सुद्धा खेळला आहे.

संजू सॅमसन राजस्थानला आणखी काय बोलला?
आयपीएल २०२६ मध्ये संजूचा पहिलाच सामना त्याच्याच पुर्व संघासोबत होणार आहे. याच सामन्यात तो सीएसकेकडून पदार्पण करणार आहे. तो म्हणाला की, “मैदानावर भावनांना काहीही किंमत नसती, त्यामुळे कोणत्याही भावना माझ्यावर वरचढ होऊन देणार नाही. आपल्या पुर्व फ्रेंचाइजीच्या विरोधात उत्तम प्रदर्शन करणार!”

याआधी तो कधीही राजस्थान रॉयल्सच्या विरोधात खेळला नाही. अनेक वर्ष त्याच्या भावनाही याच संघासोबत जोडल्या गेल्या आहेत. तसेच यावर्षी तो पहिल्यांदाच आरआरच्या विरोधात खेळताना दिसणार आहे. पण त्याने स्पष्ट संकेत दिले आहेत की, भावनांना जास्त महत्त्व न देता तो आपल्याच पुर्व संघाविरोधात चांगली कामगिरी करून दाखवणार आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.