ICC T20 world cup 2026: भारत आणि वेस्टइंडिज यांच्याच काल (१ मार्च) सामना झाला. त्यात भारतीय संघाने वेस्टइंडिजचा दारून पराभव केला. आणि आपली जागा उपांत्य फेरीसाठी निश्चित केली. आता भारतीय संघाचा उपांत्य फेरीचा (सेमीफायनल) पुढचा सामना इंग्लंडविरूद्ध आहे. हा सामना ५ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
Match: काल झालेल्या सामन्यात वेस्टइंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना १९५ धावा केल्या. आणि १९६ धावांच लक्ष भारतासमोर ठेवलं होतं. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने ५ गडी राखून विजय मिळवला. त्यात सगळ्यात मोठी कामगिरी भारताचा यष्टीरक्षक संजू सॅमसन याने केली. संजूने कालच्या सामन्यात नाबाद ९७ धावा केल्या. बाकीच्या कोणत्याही खेळाडूला ३० धावांच्या वर धावा करता आल्या नाहीत.
Record: भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात झालेल्या सामन्यात संजू सॅमसन याने वैयक्तिक नाबाद ९७ धावा केल्या. आणि असं करून त्याने दोन मोठे रेकॉर्ड मोडले आहेत. पहिला विक्रम त्याने भारताचा फलंदाज विराट कोहली याचा विक्रम मोडला आहे. विराट कोहलीने याआधी आयसीसी टी२० विश्वचषकात दोनदा धावांचा पाठलाग (runchase) करताना ८२ धावा केल्या होत्या. २०१६ ला कोहलीने ऑस्ट्रेलिया विरूद्ध आणि २०२२ ला पाकिस्तान विरूद्ध या ८२ धावा केल्या होत्या. उल्लेखनीय म्हणजे तो दोन्ही सामन्यात विराट नाबाद राहिला होता. आता हाच विराटचा विक्रम संजू सॅमसन याने मोडला आहे.
संजू सॅमसन याने वेस्टइंडिज विरूद्धच्या झालेल्या सामन्यात नाबाद ९७ धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना तो भारताचा पहिला असा फलंदाज ठरला आहे, ज्याने इतक्या धावा(९७*) केल्या आहेत. आणि याच धावामुळे त्याने विराटचा ८३ धावांचा विक्रम मोडून आपल्या नावावर केला आहे.
संजू सॅमसन याने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने भारतासाठी टी२० मध्ये सर्वाधिक ५०+ धावसंख्या केली आहे. यष्टीरक्षक-फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानावर आला आहे. याआधी हा विक्रम इशान किशनच्या नावावर होता. किशनने भारतासाठी यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून पाच वेळा ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे, तर केएल राहुलने भारतासाठी यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून ३ वेळा ५०+ धावा केल्या आहेत.

