ICC T20 world cup 2026: रविवारी (१ मार्च) भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात सामना पार पडला. हा सामना ईडन गार्डन कोलकत्ता येथे झाला. कालच्या सामन्यात भारताने वेस्टइंडिज संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. भारताने या विजयासह आपली उपांत्य फेरीची जागा पक्की केली आहे. या सामन्यात भारताने तब्बल १० वर्षांमागिल बदला घेतला आहे. १० वर्षांपुर्वी याच वेस्टइंडिजने भारताला उपांत्य फेरीत बाहेर काढल होतं. तसेच भारताने या सामन्यात दोन मोठे विक्रमही मोडले आहेत.
Do or Die: कालच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि तो निर्णय भारतासाठी फायदेशीर सुद्धा ठरला. कारण वेस्टइंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना भारताला १९६ धावांच लक्ष दिलं होतं. आणि भारताला काहीही करून हा सामना जिंकायचाच होता. कारण भारत जर हरला असता तर या आयसीसी टी२० विश्वचषकातून बाहेर पडला असता. पण भारतीय संघाने ५ गडी राखून १९६ धावांचा पाठलाग केला आणि वेस्टइंडिज संघावर विजय मिळवला.
या विजयी सामन्यात सगळ्यात मोठं योगदान भारताचा यष्टीरक्षक संजू सॅमसन (९७* धावा) याने दिलं. कारण धावांचा पाठलाग करताना एकीकडे भारतीय खेळाडू बाद होत होते तर दुसरीकडे त्याने(संजू सॅमसन) आपली बाजू मजबूत ठेवली. त्यामुळे भारतीय संघाला विजय मिळवता आला. आणि उपांत्य फेरीच तिकीट मिळवता आलं.
Record: भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात झालेल्या निर्णायक सामन्यात भारताने बाजी मारली आणि मोठे विक्रमही आपल्या नावावर केले. त्यातला पहिला विक्रम म्हणजे भारतीय संघाने याआधी कधीही १८० पेक्षा अधिक धावा कधीही केल्या नव्हत्या. त्या धावा भारतीय संघाने कालच्या सामन्यात पुर्ण केल्या आहेत (१९९). या धावा करून भारतीय संघाने स्वत: च्याच नावावर विक्रम केला आहे. तसेच वेस्टइंडिजचा विक्रमही मोडला आहेत. वेस्टइंडिज संघ आयसीसी टी२० विश्वचषकात कधीही ईडन गार्डनवर सामना हरला नव्हता. हा त्यांचा अपराजित विक्रम भारतीय संघाने मोडला आहे.
Next match: भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील सामन्याने कोण उपांत्य फेरीत खेळणार हे ठरणार होतं. आणि भारताने वेस्टइंडिजचा पराभव करून आपली जागा उपांत्य फेरीत पक्की केली. आता भारताचा पुढचा सामना इंग्लंड विरूद्ध होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (५ मार्च) खेळवला जाणार आहे.

