टी२० विश्वचषक २०२६ भारत वि. वेस्ट इंडिज: आईसीसी टी२० विश्वचषक ट्रॉफी २०२६ चे सुपर ८ चे सामने आता काहीच राहिले आहेत. त्यातलाच ग्रुप १ मधील अजून एक सेमीफायनला जाणार संघ बाकी आहे. हा सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याने ठरणार आहे. १ मार्चला ईडन गार्डनवर खेळवल्या जाणारा हा सामना दोन्ही संघासाठी ‘Do or Die’ वाला सामना आहे. कारण जो संघ जिंकणार आहे तो संघ थेट सेमीफायनलला आपली जागा पक्की करणार आहे.
सध्या सुपर-८ च्या गुणतालिकेत दोन्ही संघ २-२ अंक घेऊन समान आहेत. पण नेट रन रेट च्या बाबतीत वेस्ट इंडिज पुढं आहे. त्यांचं नेट रन रेट +1.791 आहे. तर भारताचं -0.100 आहे. अशातच हा सामना एका बाजूने क्वार्टर फायनलचा सामना न राहता फायनल सामना झाल्यासारखं आहे. आता पुढचा सामनाच ठरवणार कोण खेळणार सेमीफायनलची मॅच.
जर हा सामना रद्द झाला तर काय होईल?
आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की, जर पाऊस किंवा अन्य कोणत्या कारणाने भारत आणि वेस्टइंडिजची ही लढत नाही झाली तर, सेमीफायनला कोणती टीम खेळणार? आयसीसीच्या नियमांनुसार, जर कोणताही सामना न खेळताच रद्द झाला तर त्या दोन्ही संघाला एक-एक गुण दिले जाते. आणि जर असं झालं तर भारत आणि वेस्टइंडिज या दोघांचे गुण एकुण ३-३ होतील. आता अशा परिस्थितीत सेमीफानलमध्ये जागा मिळण्यासाठी नेट रन रेटचा आधार घेतला जातो.
सध्यस्थितीला भारतापेक्षा वेस्टइंडिजचं रन रेट खूप चांगलं आहे. म्हणजे याचा सरळ अर्थ होतो की, जर सामना रद्द झाला तर वेस्टइंडिजचा संघ सेमीफायनलला पोहोचेल. आणि या स्पर्धेतील भारताचा प्रवास तिथेच संपून जाईल.
भारताचं जिंकण्याचं समीकरण कसं आहे?
भारताचं जिंकण्याचं समीकरण एकदम सोपं आहे. सेमीफानलला भारताला खेळायचं असेल तर वेस्टइंडिज विरूद्धचा सामना जिंकायचा आणि थेट सेमीफायनल खेळायची. जर भारताने तो सामना चांगल्या रन रेटने जिंकला तर भारतासाठी तेही फायद्याचे राहू शकते.
सामन्याचं वातावरण कसं आहे?
भारत आणि वेस्टइंडिज यांचा सामना कोलकत्त्याच्या ईडन गार्डनवर होणार आहे. त्या सामन्यात वातावरण चांगलं आहे अशी आशा व्यक्त केली जातं आहे. आणि पाऊसाचीही काही समस्या होणार नाही. अशातच दोन्ही संघ आपल्या प्रदर्शनच्या जीवावर शेवटच्या चारमध्ये आपली जागा मिळवण्याचा प्रयत्न करतील.
आता हे पाहणं रोमांचक राहणार आहे की, भारतीय संघ कोणताही दबाव न घेता सामना जिंकेल आणि सेमीफानलला जागा मिळवेल. तर दुसरीकडे वेस्टइंडिजही आपला सामना कसा जिंकतील हेही पाहण मनोरंजक ठरणार आहे.

