सिंधूचा सलग १० वा पराभव; ॲन से-यंगकडून पराभूत होत आव्हान संपुष्टात

P.V. Sindhu Indonesia Open: जकार्ता येथील ‘इस्तोरा सेनायन’ (Istora Senayan) इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या प्रतिष्ठित पॉलिट्रॉन इंडोनेशिया ओपन २०२६ (BWF सुपर १०००) बॅडमिंटन स्पर्धेत भारताला मोठा धक्का बसला आहे. महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत (Round of 16) भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या दक्षिण कोरियाच्या अव्वल अ‍ॅथलीट ॲन से-यंगनं सिंधूचा २१-१७, २१-१५ असा सरळ गेम्समध्ये पराभव केला.

तब्बल ४३ मिनिटे चाललेल्या या अत्यंत चुरशीच्या सामन्यात ॲन से-यंगनं आपल्या उत्कृष्ट कोर्ट कव्हरेज आणि बचावात्मक (Defensive) खेळाच्या जोरावर सामन्यावर पूर्ण नियंत्रण ठेवलं. सिंधूनं पहिल्या गेममध्ये सुरुवातीला चांगली टक्कर दिली होती, मात्र नेटजवळील काही गंभीर चुका तिला महाग पडल्या. दुसऱ्या गेममध्येही से-यंगच्या वेगवान ड्रॉप शॉट्ससमोर सिंधू निष्प्रभ ठरली. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनच्या इतिहासात सिंधूचा ॲन से-यंगविरुद्धचा हा सलग १० वा पराभव ठरला आहे. याआधी पहिल्या फेरीत सिंधूनं थायलंडच्या बुसानन ओन्गब्रामंगफानवर विजय मिळवला होता.

भारताचे फक्त ३ खेळाडू स्पर्धेत शिल्लक
पी. व्ही. सिंधूच्या या पराभवामुळे भारताचे महिला एकेरीतील आव्हान संपले आहे. याआधी स्टार पुरुष दुहेरी संघ सात्विक-चिरागन दुखापतीमुळे पहिल्याच फेरीत माघार घेतली होती, तर लक्ष्य सेन आणि एच. एस. प्रणॉय पहिल्याच फेरीत पराभूत झाले होते. सिंधूच्या एक्झिटनंतर आता या संपूर्ण स्पर्धेत भारताचे फक्त ३ खेळाडू (दोन गटात) खेळत आहेत. भारताचा युवा खेळाडू आयुष शेट्टी हा पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत (Pre-Quarterfinals) हाँगकाँगच्या ली च्युके यियू विरुद्ध खेळत असून, तो पुरुष एकेरीतील भारताचा एकमेव शिल्लक खेळाडू आहे.

हरीहरन अमशकारुणन आणि एम. आर. अर्जुननं (पुरुष दुहेरी) पहिल्या फेरीत मलेशियाच्या बलाढ्य जोडीला नमवून मोठा उलटफेर केला होता. आता या भारतीय जोडीचा आज दुसऱ्या फेरीत मलेशियाच्याच ताई-झिंग जोडीविरुद्ध सामना होणार आहे.

उर्वरित खेळाडू आज आपली उपांत्यपूर्व फेरी (Quarterfinals) गाठण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरतील.

आणखी हेही वाचा
सात्विक-चिरागची इंडोनेशिया ओपनमधून माघार!https://agcsport.tv/other/satwik-chirag-withdraw-from-indonesia-open/


Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.