वैभव सूर्यवंशीने रचला महाविक्रम; ‘असा’ करणारा जगातील पहिला फलंदाज

Vaibhav Suryawanshi IPL 2026: काल 29 मे 2026 रोजी न्यू चंदिगढ येथील महाराजा यादविंद्र सिंग स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या आयपीएल 2026 च्या दुसऱ्या क्वालिफायर (Qualifier 2) सामन्यात गुजरात टायटन्स (GT) संघानं राजस्थान रॉयल्सचा (RR) 7 गडी राखून पराभव केला. या विजयामुळे गुजरातनं अंतिम फेरीत (Final) धडक मारली असून 31 मे रोजी अहमदाबादमध्ये त्यांची रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्ध जेतेपदासाठी लढत होईल. या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या 15 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीनं (Vaibhav Suryawanshi) एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

असा केला विक्रम
काल झालेल्या सामन्यात वैभवनं 96 धावांची उत्कृष्ट खेळी केली आणि यासोबतचं आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद 1,000 धावा पूर्ण करण्याचा अभूतपूर्व विश्वविक्रम केला. आधी हा रेकॉर्ड वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल (Andre Russell) याच्या नावावर हा विक्रम होता, ज्यानं 1000 धावा पूर्ण करण्यासाठी 545 चेंडूंचा सामना केला होता. तर वैभव सूर्यवंशीनं हा टप्पा गाठण्यासाठी फक्त 440 चेंडूंचा सामना केला. तसेच, इनिंग्सचा विचार केल्यास त्यानं अवध्या 23 डावांमध्ये (Innings) हा पल्ला गाठला.

असा रंगला सामन्याचा थरार
सामन्यात राजस्थान रॉयल्सनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीलाचं राजस्थानच्या विकेट्स गेल्या पण वैभव सूर्यवंशीच्या 47 चेंडूंतील 7 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीनं केलेल्या 96 धावांच्या खेळीमुळे तसेच रवींद्र जडेजाच्या 45 धावांच्या जोरावर राजस्थाननं 20 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 214 धावांचं मोठं आव्हान उभं केलं. मात्र, 215 धावांच्या या कठीण लक्षाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलनं 53 चेंडूंत 15 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 104 धावांची मॅचविनिंग शतकी खेळी खेळली. त्याला साई सुदर्शनच्या 58 धावांची उत्कृष्ट साथ लाभली. गुजरातनं हे आव्हान 18.4 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात हा सामना सहज जिंकला.

या सामन्यादरम्यान वैभव सूर्यवंशीनं चालू आयपीएल 2026 च्या हंगामात आपल्या 776 धावा पूर्ण केल्या असून, एकाच टी-20 स्पर्धेच्या पॉवरप्लेमध्ये 500 पेक्षा जास्त धावा करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.