कोण जिंकणार आजचा सामना; कोणचं पारडं आगे जड?

RCB vs GT IPL: आयपीएल 2026 (IPL 2026) च्या बाद फेरीचा (Playoffs) थरार आजपासून सुरू होणार आहे. क्वालिफायर 1 (Qualifier 1) सामन्यात गुणतालिकेतील अव्वल स्थानावरील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि दुसऱ्या स्थानावरील गुजरात टायटन्स (GT) हे दोन बलाढ्य संघ भिडणार आहेत. हा रोमांचक सामना आज मंगळवार, 26 मे 2026 रोजी हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (HPCA) स्टेडियम, धर्मशाळा येथे खेळवला जाईल. या सामन्यातील विजेता संघ थेट 31 मे रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या अंतिम फेरीत (Final) प्रवेश करेल, तर पराभूत संघाला क्वालिफायर 2 मध्ये आणखी एक संधी मिळेल.

आयपीएलच्या इतिहासात बाद दोन्ही संघाच्या बाद फेरीचा (Playoffs) विचार केल्यास, दोन्ही संघांनी अतिशय चांगला खेळ दाखवला आहे. आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्याची कामगिरी केली आहे. डिफेंडिंग चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं चालू 2026 च्या हंगामासह आयपीएल इतिहासात तब्बल 11 व्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. सर्वाधिक वेळा प्लेऑफ गाठण्याच्या यादीत आरसीबी आता मुंबई इंडियन्ससह संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, 2022 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या गुजरात टायटन्सनं आतापर्यंत 4 थ्यांदा प्लेऑफ सामने गाठले असून बाद फेरीत त्यांची कामगिरी नेहमीच जबरदस्त राहिली आहे.

दोन्ही संघाचे हेड-टू-हेड रेकॉर्ड
आयपीएलच्या इतिहासात या दोन्ही संघांमधील लढत नेहमीच अटीतटीची राहिली आहे. आतापर्यंत खेळवल्या गेलेल्या 8 सामन्यांपैकी आरसीबीनं 4 तर गुजरात टायटन्सनं 4 सामने जिंकले आहेत. यंदाच्या चालू 2026 च्या हंगामातही दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध 1-1 सामना जिंकून एकमेकांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकेल आणि अंतिम फेरीत धडक मारेल याकडे अनेक आयपीएल चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.