वैभवने केला वर्ल्ड रेकॉर्ड; अनेक खेळाडूंचे मोडले विक्रम

Vaibhav Suryawanshi: राजस्थान रॉयल्सचा (RR) 15 वर्षाचा युवा खेळाडू वैभव सुर्यवंशी यानं लखनऊ सुपर जायंट्सविरूद्ध (LSG) झालेल्या सामन्यात अवध्या 38 चेंडूत 93 धावांंची आक्रमक खेळी केली. या खेळीनं त्यानं इतिहासात नाव कोरलं आहे.

काल झालेल्या सामन्यात वैभवच्या खेळीनं लखनऊच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. कोणत्याही गोलंदाजाना वैभवची विकेट कशी मिळवावी हे कळत नव्हतं. त्यानं लखनऊविरूद्ध मोठी खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला आणि कालच्या खेळीनं तो टी20 टुर्नामेंटमध्ये 500 धावा करणारा जगातील पहिला युवा खेळाडू बनला आहे. यासोबतच आयपीएल इतिहासात वैभव 20 वर्षाच्या वयाच्या आधीच आयपीएलच्या एका हंगामात 500 धावा करणारा एकमेव खेळाडू बनला आहे.

टी20 टुर्नानमेंटमध्ये 500 धावांचा आकडा पार करणारा वैभवच्या आधीचा खेळाडू देवदत्त पडिक्कल आहे. त्यानं 2019-20 च्या सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीमध्ये कर्नाटक संघाकडून खेळतानी अवध्या 19 वर्षाच्या वयात 580 धावा काढल्या होत्या. पण वैभवनं त्याचा हा रेकॉर्ड मोडला आहे आणि आपल्या नावावर केला आहे, कारण वैभवनं अवध्या 15व्या वर्षीच हा कारनामा (500 धावा) करून दाखवला आहे.

जर आयपीएलविषयीच्या रेकॉर्डचं सांगायचं झालं तर 2018 मध्ये ऋषभ पंत हा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत असताना एकाच हंगामात 500 धावांचा आकडा पार करणारा युवा खेळाडू होता, तेव्हा त्याचं वय 20 वर्ष होतं. पण हाही रेकॉर्ड वैभवनं मोडून काढला आहे. त्यानं 20 वर्षाच्या आतच यंदाच्या आयपीएल हंगामात 500 धावांचा आकडा पुर्ण केला आहे आणि असं करणारा वैभव जगातील सगळ्यात युवा खेळाडू ठरला आहे.

आणखी हेही वाचा
कार्लोस अल्काराझची विम्बल्डन २०२६ मधून माघार-
https://agcsport.tv/tennis/carlos-alcaraz-withdraws-from-wimbledon-2026/?_thumbnail_id=1925

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.