धोनी आज घेणार निवृत्ती; त्यानेच दिले संकेत

MS Dhoni IPL 2026: आयपीएल 2026 मध्ये आजच्या 63 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि सनराईजर्स हैदराबाद (SRH) हे दोन्ही संघ समोरासमोर येणार आहेत. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) मध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. सीएसकेला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहायचं असेल तर हैदराबादविरूद्धचा सामना जिंकण त्यांना अनिवार्य आहे. हा सामना पाच वेळेचा चॅम्पियन सीएसके संघासाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी एक भावनिक सामना होऊ शकतो. कारण सीएसकेचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा हा शेवटचा सामना असू शकतो.

धोनीनेच दिली निवृत्तीचे संकेत
2021 मध्ये धोनीनं एक विधान केलं होतं, त्याचाच अंदाज घेऊन आजचा सामना त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा सामना होऊ शकतो. धोनीनं सांगितलं की, “माझा शेवटचा टी20 चा सामना चेन्नईमध्ये होणार. भलेही तो पुुढच्या वर्षी असेल किंवा पाच वर्षानंतर असेल, मला माहिती नाही”. आता याच विधानाला धरून अनेकांना वाटत आहे की, धोनी आज त्याचा शेवटचा सामना चेन्नईमध्ये हैदराबाद विरूद्ध खेळेल.

यंदाच्या हंगामात एकही सामना खेळला नाही
धोनी या हंगामात दुखापतीमुळे यंदाच्या (IPL 2026) हंगामात एकही सामना खेळला नाही. पण आजचा सामना तो खेळण्याची शक्यता आहे. तसेच त्याच्या विधानानं असंच वाटत आहे की, चेपॉकमध्ये होणाऱ्या आजच्या सामन्यात तो आयपीएलमधून निवृत्ती घेईल.

गुणतालिकेत सीएसके कोणत्या स्थानावर?
सीएसके संघ गुणतालिकेत 12 गुणांसह 5व्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत 12 सामने खेळले असून 6 सामन्यात विजय आणि 6 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. जर त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचं असेल तर उर्वरित दोन्ही सामन्यांत त्यांना विजय मिळवावा लागेल.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.