15 वर्षापासून आरसीबीविरूद्ध पंजाबला मिळाला नाही विजय

RCB vs PBKS IPL 2026: आज (17 मे) आयपीएल 2026 मध्ये पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. हा सामना दुपारी 3.30 ला धर्मशाळाच्या HPCA या मैदनावर खेळवला जाणार आहे.

पंजाब किंग्स संघ सध्या संघर्षातून जात आहे. सुरूवातीला ज्या पंजाब किंग्सनं सगल 6 सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान राखल होतं त्या पंजाब किंग्सला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पंजाबला गेल्या पाचही सामन्यांत पराभवाचा झटका बसला आहे. पंजाब सध्या गुणतालिकेत 13 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. आजचा सामना त्यांच्यासाठी निर्णायक सामना ठरणार आहे. कारण आज जर त्यांचा पराभव झाला तर जवळपास पंजाब या हंगामातून बाहेर पडणार आहे. तसेच पंजाबच्या नावावर आरसीबीविरूद्ध नकोसा रेकॉर्ड सुद्धा आहे. पंजाबनं त्यांच्याविरूद्ध गेल्या 15 वर्षात धर्मशाळाच्या मैदानावर सामना जिंकला नाही. पंजाबनं शेवटचा सामना या मैदानावर 2011 साली जिंकला होता.

तर दुसरीकडे, आरसीबीला हा सामना फक्त त्यांचं अव्वल स्थान राखण्यासाठी असणार आहे. कारण सध्या आरसीबी 16 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. म्हणजे आरसीही जवळपास प्लेऑफमध्ये पोहोचली आहे. जर आरसीबीनं आजचा सामना जिंकला तर अव्वल स्थान राखण्यात ते यशस्वी ठरतील आणि पंजाबचा संघ या हंगामातून बाहेर पडेल.

हेड टू हेड
आरसीबी आणि पंजाब या दोन्ही संघातील सामने नेहमीच चुरशीचे राहिले आहेत. यांच्यात आतापर्यंत 37 सामने झाले आहेत. तर यातील 19 सामने आरसीबीनं जिंकले आहेत आणि 18 सामने पंजाबनं जिंकले आहेत.

दोन्ही संघाची प्लेईंग 11
रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु
: विराट कोहली, जेकब बेथेल, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, वेंकटेश अय्यर, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि जेकब डफी

पंजाब किंग्स: प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंह (यष्टीरक्षक), कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यांश शेडगे, शशांक सिंह, अजमतुल्लाह ओमरजई, विजयकुमार वैशाख, मार्को यान्सन, अर्शदीप सिंह आणि युजवेंद्र चहल

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.