‘यंग टायग्रेसेस’ समोर जपानचे आव्हान; विश्वचषकाच्या स्वप्नासाठी लढत निर्णायक!

Women’s Asian Cup: चीनमध्ये सुरू असलेल्या ‘एएफसी अंडर-17 महिला आशिया चषक 2026’ (AFC U-17 Women’s Asian Cup) स्पर्धेत आज भारतीय महिला संघाची खरी कसोटी आहे. ‘ब’ गटातील आपल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ आज चार वेळच्या चॅम्पियन जपान विरुद्ध मैदानात उतरणार आहे. हा सामना भारतीय आज (5 मे) सुझोऊ तायहू फुटबॉल स्पोर्ट्स सेंटरवर खेळवला जाईल.

पहिल्या सामन्याचा निकाल
भारतीय संघाची या स्पर्धेतील सुरुवात निराशाजनक झाली आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला 0-2 अशा पराभवाचा सामना करावा लागला. चौथ्या स्थानावर आहे, त्यामुळे बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला आजच्या सामन्यात किमान बरोबरी किंवा विजय मिळवणे अनिवार्य आहे. तर दुसरीकडं, जपानचा संघ प्रचंड फॉर्मात असून त्यांनी पहिल्या सामन्यात लेबनॉनचा 13-0 असा एकतर्फी धुव्वा उडवून दुसऱ्या स्थानावर आहे.

या स्पर्धेतील अव्वल 4 संघ 2026 च्या फिफा अंडर-17 महिला विश्वचषकासाठी पात्र ठरणार असल्यान भारतासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांना आशा आहे की, आजचा सामना भारतीय संघ जिंकेल आणि स्पर्धेतील आपलं आव्हान टिकवून ठेवेल.

भारतीय संघाचे आजच्या सामन्यातील संभाव्य खेळाडू
भारत (India U-17)
: जुलान नोंगमायथेम, मुन्नी (गोलरक्षक), अभिश्रिता बसनेत (कर्णधार), अलिना देवी, दिव्यानी लिंडा, एलिझाबेद लाक्रा, रितू बडाईक, बोनिफिलिया शुल्लाई, प्रीतीका बर्मन, अनुष्का कुमारी, पर्ल फर्नांडिस

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.