Ruturaj gaikwad: मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यात चेेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकी खेळीनं आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. ऋतुराज गायकवाड यानं नाबाद 48 चेंडूत 67 धावा केल्या. या नाबाद 67 धावाच्या खेळीनं ऋतुराजनं आयपीएलमध्ये एक मोठा रेकॉर्ड केला आहे. ऋतुराज गायकवाड आयपीएल इतिहासामध्ये 79 डावानंतर सगळ्याच जास्त 50+ धावा करणारा दुसरा फलंदाज बनला आहे. असं करून गायकवाडनं क्रिस गेल याचं रेकॉर्ड तोडलं आहे. गेलनं आयपीएल इतिहासात 79 डावानंतर एकूण 23 वेळेस 50+ धावा केल्या होत्या. दरम्यान, गायकवाडच्या नावावर 79 डावानंतर 24 वेळेस 50+ धावा केल्या आहेत.
79 आयपीएल डावानंतर सगळ्यात जास्त 50+ धावा
> केएल राहुल- 27
> ऋतुराज गायकवाड- 24
> डेव्हिड वॉर्नर- 23
> क्रिस गेल- 23
धोनीच तोडलं रेकॉर्ड
ऋतुराज गायकवाड यानं धोनीचाची रेकॉर्ड तोडला आहे. त्यानं सीएसकेसाठी सगळ्यात जास्त 50+ धावा केल्या आहेत आणि असं करणारा तो सीएसकेचा दुसरा खेळाडू ठरला असून धोनीला मागे टाकलं आहे. धोनीनं सीएसकेसाठी 22 वेळेस 50+ धावा केल्या आहेत. तर सीएसकेसाठी सगळ्यात जास्त 50+ धावा करण्याचा रेकॉर्ड सुरेश रैना याच्या नावावर आहे. रैनानं 34 वेळेस हा कारनामा चेन्नईसाठी आयपीएलमध्ये केला आहे.
IPL मध्ये CSK साठी सर्वाधिक 50+ धावा
> सुरेश रैना- 34 (171 डाव)
> ऋतुराज गायकवाड- 24 (79 डाव)
> MS धोनी- 22 (215 डाव)
> फाफ डु प्लेसिस- 20 (86 डाव)
आणखी हेही वाचा
समीर रिझवीने धोनीला सांगितले नमाज पठण करायला?-https://agcsport.tv/cricket/did-sameer-rizvi-tell-dhoni-to-offer-prayers/

