Bhuvneshwar Kumar: भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याचं आयपीएल 2026 मधील प्रदर्शन अद्याप खूप चांगलं दिसत आहे. ज्यानं गुजरात टायटन्सविरूद्ध झालेल्या सामन्यात त्यानं 3 विकेट घेऊन एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
आयपीएल 2026 मध्ये 42व्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात सामना पार पडला. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला गेला आहे. हा सामना गुजरात टायटन्स संघानं 4 विकेट्स राखून जिंकला. याच सामन्यात आरसीबीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यानं 4 षटक टाकले आणि 28 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या. यासोबतच भुवनेश्वर कुमारनं टी20 (T20) क्रिकेटमध्ये अशी कामगिरी केली आहे जी याआधी कोणत्याही भारतीय वेगवान गोलंदाजांनी केली नाही.
भुवनेश्वरच्या टी20 मध्ये 350 विकेट्स
गुजरात टायटन्सच्या विरूद्ध खेळल्या गेेलेल्या सामन्यात भुवनेश्वर कुमार यानं पॉवरप्लेमध्येच 2 विकेट्स घेतल्या आणि टी20 क्रिकेटमध्ये 350 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. यासोबतच भुवनेश्वर कुमार पहिला असा भारतीय वेगवान गोलंदाज बनला आहे, ज्यानं अशी कामगिरी केली आहे. भुवनेश्वर कुमारचं टी20 मध्ये इकोनॉमी पाहिली तर 7.35 आहे. जर त्याच्या यंदाच्या आतापर्यंतच्या आयपीएल हंगामाबद्दल पाहिलं तर त्यानं पर्पल कॅप आपल्या नावावर केली आहे. भुवनेश्वरनं 9 सामन्यांत 17 विकेट्स घेतल्या आहेत.
चहलच्या नावावर सगळ्यात जास्त विकेट
टी20 क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडू म्हणून सगळ्यात जास्त विकेट घेण्याचा रेकॉर्ड फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या नावावर आहे. ज्यानं एकूण 391 विकेट घेतल्या आहेत. यानंतर दुसऱ्या नंबरला 352 विकेट घेऊन भुवनेश्वर कुमार आहे. तिसऱ्या स्थानावर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ज्यानं आतापर्यंत टी20 क्रिकेटमध्ये 347 विकेट घेतल्या आहेत. चौथ्या नंबरला भारताचा पुर्व फिरकीपटू पीयूष चावलाचं नाव आहे ज्यानं टी20 क्रिकेटमध्ये 327 विकेट घेतल्या आहेत.
आणखी हेही वाचा
रजत पाटीजारचा झेल योग्य की अयोग्य?-https://agcsport.tv/cricket/rajat-patijar-catch-right-or-wrong/

