जगातील पहिला क्रिकेटर ज्याला झाली फाशीची शिक्षा!

Leslie Hylton: केटच्या जगतात खेळाडू आपल्या अनेक रेकॉर्ड्सच्या जोरावर नाव कमवतात आणि महान खेळाडू सुद्धा बनतात. अशा खेळाडूंना पैसा, सन्मान आणि आदर या सगळ्या गोष्टी मिळतात. अशातच अनेक क्रिकेटपटू असेही असतात ज्यांना रेकॉर्ड्समुळे नाही तर वादाच्या गोष्टींमुळे त्यांना लक्षात ठेवलं जातं. काही खेळाडूंना वेगवेगळ्या गुन्ह्यामुळे जेलची शिक्षा सुद्धा झाली, पण एक क्रिकेटर असाही आहे ज्याला फक्त शिक्षाचं नाही तर फाशी झाली आहे.

या खेळाडूचं बालपण अगदी साधं आणि गरीबीमध्ये गेलं. त्यानं त्याच्या वडिलांना सुद्धा कधी पाहिलं नाही. बालपणातच आईचाही मृत्यू झाला. त्यामुळे त्याला त्याच्या मावशीनं सांभाळलं. जेव्हा तो किशोर वयात आला त्यावेळी त्याच्या मावशीचाही मृत्यू झाला. दोन वेळेच्या भाकरीसाठी त्यानं अनेक ठिकाणी काम केलं. इतक्या कठोर संघर्षातून त्यानं क्रिकेटमध्ये नाव कमावलं आणि राष्ट्रीय संघात स्थान मिळवलं. त्यानंतर त्यानं पोलिसवाल्याच्या मुलीसोबत प्रेमविवाह केला पण यानंतर त्याच्या जीवनाचा दुर्दैवी अंत झाला.

ज्या क्रिकेटपटू विषयी सांगत आहे, तो वेस्टइंडिजचा पुर्व वेगवान गोलंदाज लेस्ली हिल्टन आहे. मार्च 1905 मध्ये जन्मलेल्या या लेस्लीला त्याचे वडिल कोण होते हे त्याला आयुष्यभर समजले नाही. तो जेव्हा 3 वर्षाचा होता त्यावेळी त्याच्या आईचंही निधन झालं. बहिणीनं त्याचं पालनपोषन केलं पण बहिणीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याला माऊशीनं सांभाळलं. पण माऊशीच्या मृत्यूनंतर त्याचं सगळंच शिक्षण थांबलं. दोन वेळेच्या भाकरीसाठी त्याला काम करावं लागलं.

याचं कामासोबत तो क्रिकेट सुद्धा खेळत. एका स्थानिक क्लबनं त्याला संधी दिली. या संधीतून तो क्रिकेट विश्वाच्या समोर आला. सुरूवातीला तो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करत होता. मेहनतीच्या जोरावर आणि त्याच्या कौशल्यावर त्याला शेवटी 1935 मध्ये इंग्लंडविरूद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली.

पोलिसवाल्याच्या मुलीसोबत प्रेम आणि लग्न
क्रिकेटमध्ये यशस्वी झाल्यावर लेस्लीनं एका पोलिसाच्या मुलीच्या प्रेमात तो पडला, जीच नाव लर्लिन रोज होतं. या दोघांनी 1942 साली लग्न केलं. पण त्यानंतर हळू-हळू परिस्थिती बदलू लागली आणि 1954 ला तर आणखीनच बिघडली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार बिझनेसच्या कामासाठी लर्लिन रोज अनेकदा न्यूयॉर्क जात होती. या दरम्यान लेस्ली याला एक चिट्टी मिळाली, ज्यात लिहिलं होतं की, त्याच्या पत्नीचे दुसरीकडे अनैतिक संबंध होते. पण रोजनं या गोष्टीला नाकारलं. ज्यानं ही सगळी घटना जरा शांत झाली, पण लेस्ली हिल्टनच्या जीवनात आणखी काही लिहून ठेवलं होतं.

पत्नीला मारल्या 7 गोळ्या
काही दिवसानंतर हिल्टनला ती चिट्टी मिळाली, ज्याच त्याच्या पत्नीनं एका फ्रांसिसला नावाच्या व्यक्तीला पाठवली होती. या फ्रांसिससोबतच तीचे अनैतिक संबंध होते. यानंतर रागाच्या भरात लेस्लीनं त्याच्या पत्नीला गोळ्या मारल्या. त्यानं एक-दोन नाहीतर तब्बल 7 गोळ्या मारल्या, ज्यात तिझा मृत्यू झाला. पत्नीच्या खूनात त्याला 17 मे 1955 मध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली.

लेस्लीचं क्रिकेट कारकिर्द
लेस्ली हिल्टननं क्रिकेट कारकिर्दीत वेस्टइंडिजकडून क्रिकेट कसोटीत 6 सामने खेळले. या 6 सामन्यात त्यानं 2.59 च्या इकोनॉमीसोबत 16 विकेट घेतल्या. ज्यात 27 धावा देऊन 4 विकेट घेतल्या आणि हे त्याचं उत्तम प्रदर्शन होतं, जे इंग्लंडविरूद्ध केलं होतं. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 40 सामन्यात 120 विकेट घेतल्या आहेत.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.