Rohit Sharma: क्रिकेट जगतात ‘हिटमॅन’ म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा याचा आज वाढदिवस आहे. 30 एप्रिल 1987 मध्ये जन्मलेला रोहित शर्मा सर्वश्रेष्ठ फलंदाजापैकी एक मानला जातो. तसेच त्याचे असे काही रेकॉर्ड्स आहेत जे तोडणं जवळपास अशक्य आहेत. रोहित शर्मानं कसोटी क्रिकेटमध्ये 67 सामन्यात 4301 धावा, ODI मध्ये 282 सामन्यात 11577* धावा आणि T20I मध्ये 159 सामन्यात 4231 धावा केल्या आहेत.
1) ODI मध्ये 3 दुहेरी शतक
रोहित शर्मा याच्या नावावर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतक लावण्यात वर्ल्ड रेकॉर्ड आहे. असं करणारा तो क्रिकेट जगतातील एकमेव फलंदाज आहे. त्यामुळे हे रेकॉर्ड तुटन जवळपास अशक्य आहे. हे रेकॉर्ड त्यानं श्रीलंकेविरूद्ध (2) आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध (1) केले आहेत.
2) ODI मध्ये सगळ्यात मोठी खेळी
रोहित शर्माच्या अनेक रेकॉर्डपैकी हा सगळ्यात मोठा रेकॉर्ड मानला जातो आणि हा कोणत्याही इतर फलंदाजांना तोडण अशक्य आहे. रोहितनं 13 नोव्हेंबर 2014 ला कोलकत्त्यात श्रीलंकाविरुद्ध ही मोठी खेळी केली होती. त्यानं या सामन्यात 173 चेंडूत 33 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीनं तब्बल 264 धावा केल्या होत्या, जो आजही मोठा रेकॉर्ड आहे. तसेच आतापर्यंत कोणत्या फलंदाजाला हा रेकॉर्ड तोडता आला नाही. भारतानं या सामन्यात 153 धावांनी विजय मिळवला होता.
3) T20I क्रिकेट मध्ये सगळ्यात जलद शतक लावणारे भारतीय
रोहित शर्मा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद शतक लावणारे भारतीय फलंदाज आहेत. रोहितनं हे शतक 22 डिसेंबर 2017 ला श्रीलंकेविरूद्ध इंदोरच्या होळकर स्टेडियममध्ये खेळलेल्या टी20आय सामन्यात अवघ्या 35 चेंडूत शकत ठोकलं होतं. रोहित शर्मानं या सामन्यात 43 चेंडूत 118 धावांची आक्रमक खेळी केली होती, ज्यात 12 चौकार आणि 20 षटकार लावले होते.
4) एकाच वनडे विश्वषचकात सगळ्यात जास्त शतक
रोहित शर्माच्या नावावर एकाच वनडे विश्वचषकात सगळ्यात जास्त शतके करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे.रोहितनं 2019 च्या वनडे विश्वचषकात सगळ्यात जास्त (5) शतके लावले आहेत आणि हा रेकॉर्ड तुटणं सुद्धा अशक्य मानलं जात आहे.
5) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त षटकार
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा सगळ्यात जास्त षटकार लावणारे खेळाडू आहे. रोहितनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत तब्बल 650 षटकार लावले आहे आणि असा करानामा करणारा जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज आहे. रोहितनं ODI मध्ये 357 षटकार, T20I मध्ये 205 षटकार आणि कसोटी क्रिकेटमध्ये 88 षटकार लावले आहेत.
आणखी हेही वाचा
चक्क मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या बाहेर?- https://agcsport.tv/cricket/mumbai-indians-out-of-the-playoffs/

