IPL 2026 MI vs SRH: आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सचं खराब प्रदर्शन आणखी सुरूच आहे. काल (बुधवार 29 एप्रिल) झालेल्या सामन्यात मुंबई इडियन्सला घरच्या मैदानावर खेळताना सनराजर्स हैदराबादकडून 6 विकेट्सनं सामना गमवावा लागला. या पराभवामुळेच मुंबईचं प्लेऑफच स्थान मिळवण्याच्या अडचणीत सुद्धा वाढ झाली आहे.
मुंबईच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. रायन रिकलटननं नाबाद शतकी खेळी केली आणि याच खेळीच्या मदतीनं मुंबईनं 20 षटकांत 243 धावा केल्या. पण हैदराबादच्या अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी सुरूवातीपासूनचं आक्रमक फलंदाजी केली. या दोघांच्या समोर बोल्ड आणि बुमराहसारखे गोलंदाज सुद्धा काही करू शकले नाही. शेवटी हेनरिक क्लासेन याच्या नाबाद आणि आक्रमक खेळीनं मुंबईचा पराभव निश्चित केला. मुंबईचा हा पराभव यंदाच्या हंगाातील 6वा होता. यांनी 8 सामन्यांत फक्त 2 विजय मिळवले आहे आणि 4 गुणांसह 9व्या स्थानावर आहे. यामुळेच आता प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या आशाही जवळपास संपल्या सारख्या झाल्या आहेत.
कसं आहे प्लेऑफचं मुंबईचं गणित?
मुंबई इंडियन्सनं यंदाच्या हंगामात आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी 6 सामन्यांत पराभव मिळाला असून 2 सामन्यांत विजय मिळवला आहे. या 2 विजयामुळे 4 गुण त्यांच्या नावावर आहेत. आता मुंबईसाठी प्लेऑफचं गणित एकदम सोपं आहे. त्यांना प्रत्येक सामन्यांत विजय मिळवावा लागेल म्हणजे पुढच्या 6 सामन्यांत 6 विजय त्यांच्यासाठी अनिवार्य असतील. तेव्हाच त्यांचे गुण 16 होतील आणि यांच 16 गुणांसह प्लेऑफचं दार खुलं होऊ शकते.
पण या दरम्यात मुंबईच्या संघाला एक जरी पराभव मिळाला तरी त्यांच्या प्लेऑफच्या आशा संपुष्टात येऊ शकतो. जरी त्यांना एक पराभव मिळाला तर 14 गुण मिळवतील. पण यामुळे त्यांना दुसऱ्या संघाच्या कामगिरीवर अवलंबून रहावं लागणार आहे आणि जर त्यांचा दुसरा पराभव झाला तर मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल.

