IPL 2026 Riyan Parag: आयपीएल 2026 मध्ये काल (मंगळवार 29 एप्रिल) झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्या सामन्यादरम्यात एक मोठा वादाचा विषय घडला आहे. राजस्थानचा कर्णधार रियान पराग याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात तो ड्रेसिंग रूममध्ये ‘वेप’ (हुक्का) चा वापर करताना दिसला. ही घटना दुसऱ्या डावात 16 व्या षटकात पहायला मिळाली, जेव्हा कॅमेरामॅननं कॅमेरा काही क्षणांसाठी रियान पराग याला कॅमेरात दाखवलं. विशेष म्हणजे ही फिटेज त्याचवेळी आली जेव्हा रियान पराग ऐनवेळी फलंदाजी करताना बाद झाला आणि ड्रेसिंग रूममध्ये हुक्का ओढताना दिसला. त्यामुळे आता अनेकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे की, क्रिकेटमध्ये नियम आहे की नाही.
परागचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर प्रश्न तर केले जात आहेत पण स्टेडियममध्ये वेपच्या वापरविषयी कोणतही स्पष्ट नियन नाहीत. पण भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) कडे स्टेडियमच्या आत काही नियम आहेत. आरोग्य आणि सुरक्षा प्रॉटोकॉलनुसार ड्रेसिंग रूम किंवा डगआऊटमध्ये तंबाखू किंवा इतर आमली पदार्थांचा उपयोग करण याच्यासाठी निर्बंध आहेत. त्यामुळे रियान परागवर कारवाईचा धोका निर्माण झाला आहे.
काय आहे हे वेपिंग?
वेपिंगचा अर्थ ई-सिगरेट म्हणजेच हुक्का आहे. किंवा अशी वस्तू ज्याचा वापर कुठेही केला जातो. त्यात निकोटीन, फ्लेवर आणि अन्य रसायनांना गरम केलं जातं आणि त्यातून निघणारा वाफ श्वासाद्वारे आत घेण. ही अशी गोष्ट आहे जी पारंपारिक धूम्रपानचा आधुनिक रूप आहे, ज्यात धुरच्या ऐवजी वेपर (वाफ) चा उपयोद होतो.

