मुंबई इंडियन्स संघाचा मुख्य फिरकी गोलंदाज आयपीएलमधून बाहेर

IPL 2026 MI: आयपीएल 2026 मध्ये अनेक संघातील खेळाडू दुखापतीमुळे बाहेर होतं आहेत. त्यातच आता मुंबई इंडियन्सच्या संघाला सुद्धा एक मोठा झटका बसला आहे. संघाचा मुख्य फिरकी गोलंदाज आणि अनुभवी अष्टपैलू खेळाडू मिचेल सँटनर यंदाच्या हंगामातून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्याच्या जागी आता दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज याला उर्वरित हंगामासाठी संघात स्थान देण्यात आलं आहे.

मिचेल सँटनर का बाहेर झाला?
मुंबई इंडियन्सचा मागील सामना चेन्नई सुपर किंग्स यांच्यासोबत झाला. त्या सामन्यात मिचेल सँटनर याला कार्तिक शर्माचा झेल घेताना दुखापत झाली. ही दुखापत त्याच्या खांद्याला झाली. त्यावेळी त्याच्या जागी दुसरा खेळाडू सुद्धा खेळला आणि तेव्हापासूनच सँटनर बाहेर आहे. आता त्याच खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला संपुर्ण हंगाम खेळता येणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी केशव महाराज याला संघात घेतलं आहे. तसेच तो लवकर बरा व्हावा यासाठी मुंबई इंडियन्सनं आशाही व्यक्त केल्या आहेत.

मिचेल सँटनर याला या आयपीएल 2026 च्या हंगामासाठी मुंबईनं 2 कोटी रूपयांना विकत घेतलं होतं. त्यानं यंदाच्या हंगामात 4 सामन्यांत 8.93 च्या इकोनॉमीनं 5 विकेट घेतल्या आहेत. तर फलंदाजीमध्ये सुद्धा योगदान दिलं आहे. त्यानं 4 सामन्यांत 136.84 स्ट्राईक रेटनं खेळताना 26 धावा केल्या आहेत.

तर दुसरीकडं, ज्या केशव महाराज याला संघात घेतलं आहे त्यानं आतापर्यंत आयपीएलमध्ये फक्त दोन सामने खेळले आहेत. पण अद्याप त्यानं आयपीएलमध्ये गोलंदाजी केली नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाचं आणि त्यांच्या चाहत्यांचं लक्ष त्याच्या कामगिरीकडं लागून आहे.

आणखी हेही वाचा
दिल्लीच्या नावावर ‘हा’ निराशाजनक रेकॉर्ड-
https://agcsport.tv/cricket/this-is-a-disappointing-record-for-delhi/

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.