लखनऊच्या पराभव काय कारण आहे?

KKR vs LSG IPL 2026: लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि कोलकत्ता नाईट रायडर्स (KKR) यांच्या काल (रविवार, 26 एप्रिल) सामना पार पडला. हा सामना लखनऊच्या घरच्या मैदानावर, इकाना स्टेडियमवर, झाला. सामना इतका चुरशीचा झाला की हा सामना बरोबरीत (टाई) गेला, जिथे केकेआरच्या संघानं बाजी मारली. यंदाच्या हंगामातील ही पहिली सुपर ओव्हर होती, जी काल पाहायला मिळाली. दरम्यान आता हा प्रश्न उपस्थित होतं आहे की, जो सामना लखनऊला पहिल्यांदाच जिंकायला पाहिजे होता तो सामना सुपर ओव्हरला कसा गेला? सुपर ओव्हरला सामना जरी गेला तरी लखनऊला काहीही करता आलं नाही. आणि पराभवाचे कारण एक फलंदाज मानला जात आहे.

लखनऊ समोर 156 धावांत लक्ष्य
केकेआरच्या संघानं प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 155 धावा केल्या. त्यामुळे लखनऊला जिंकायला अवध्या 156 धावा करायच्या होत्या, जे खूप मोठं लक्ष्य नव्हतं. पण त्या धावांचा पाठलाग करताना उतरलेल्या लखनऊचा संघ सुरूवातीलाच विकेट्स गमावून बसला. सलामी फलंदाज मिचेल मार्श फक्त 2 धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार ऋषभ पंत आला त्यानं 38 चेंडूत 42 धावा केल्या. पण चौथ्या क्रमांकाच फलंदाज निकोलस पुरन आला आणि त्यानं धावांची गती थांबवली. त्यानं 12 चेंडूत फक्त 9 धावा केल्या. त्यानंतर कोणत्याही लखनऊच्या फलंदाजाला म्हणावी तशी खेळी करता आली नाही. लखनऊचा पराभव होणारच होता त्यात मोहम्मद शमी यानं शेवटच्या चेंडूवर षटकार लावला आणि लखनऊला पराभवापासून वाचवलं. शेवटी सामना बरोबरीत सुटला आणि लखनऊला जिंकण्यासाठी आणखी एक संधी मिळाली.

सुपर ओव्हरचा थरार
लखनऊचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. पण यात एक गोष्ट की, लखनऊनं अशा खेळाडूला फलंदाजीसाठी पाठवलं ज्याचा या हंगामात फॉर्म अजिबात चांगला नाही तो म्हणजे निकोलस पुरन. शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. सुनिल नरेनच्या पहिल्याच चेंडूत त्याची विकेट पडली आणि इथेच सामना फिरला. त्यानंतर कर्णधार ऋषभ पंत आला. त्यानं दुसऱ्या चेंडूत एक धावा काढली. तर तिसऱ्या चेंडू मारक्रम षटकार लावायला गेला आणि त्याचीही विकेट पडली आणि त्या डावाचा शेवट झाला. लखनऊनं सुपर ओव्हरला फक्त एक धावा केली, केकेआरनं पहिल्याच चेंडूत काढून टाकली आणि सामना आपल्या नावावर केला.

पराभवाच कारण
निकोलस पुरन यावर्षीच्या हंगामात आतापर्यंत पुर्णपणे फ्लॉप राहिला आहे. त्यानं लखनऊसाठी सगळे सामने खेळले पण त्याला अद्याप एकही अर्धशतक करता आलं नाही. त्यानं सगळ्यात मोठी धावसंख्या 22 केली आहे, जे राजस्थान रॉयल्सच्या विरूद्ध केली आहे. चार वेळेस तो सिंगल धावसंख्येवर बाद झाला आहे. केकेआरविरूद्ध त्याला चांगली संधी होती सामना जिंकून देऊन हिरो बनायची पण त्याला संधीच सोनं करता आलं नाही नाही. त्यामुळे पराभवाच सगळ्यात मोठं कारण निकोलस पुरन याला मानलं जातं आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.