गुजरातचा पराभव कुठे झाला?

IPL 2026 RCB vs GT: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यात बंगळुरूनं गुजरातचा 5 विकेट्सनं पराभव केला. आरसीबीचा या हंगामातील हा पाचवा विजय होता. गुजरातसाठी साई सुदर्शन यानं शतक मारलं पण ते मारलेलं शतक कामी आलं नाही. तर आरसीबीसाठी विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल या दोघांनीही अर्धशतक लावले. कोहलीनं या सामन्यात 44 चेंडूत 81 धावांची ताबडतोब खेळी केली. आणि याच खेळीनं विराटनं या हंगामातील ऑरेंज कॅप सुद्धा आपल्या नावावर केली आहे.

बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळताना गुजरातच्या संघानं प्रथम फंलदाजी करताना 205 धावा केल्या. यात साई सुदर्शन यानं गुजरातसाठी सगळ्यात जास्त धावा केल्या. त्यानं या सामन्यात शतकी खेळी केली. त्यानं 11 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीनं 100 धावा केल्या. साई सुदर्शनच्या खेळीनंच गुजरातला 200 धावांचा टप्पा पार करता आला.

प्रत्युत्तरात उतरलेल्या आरसीबीनं 1 षटक आणि 1 चेंडू असतानाच 5 विकेट्सनं सामना जिंकला. यात विराट कोहली (81 धावा) आणि देवदत्त पडिक्कल (55 धावा) या दोघांच्या शतकीय भागिदारीनं आरसीबीला जिंकण्याच्या उंबरठ्यावर पोहोचवले. शेवटी क्रुणाल पंड्या आणि टीम डेव्हिडनं 7 चेंडू शिल्लक असतानाच सामना जिंकवला. तसेच या विजयामुळे आरसीबीचा संघ आयपीएल 2026 च्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

हा सामना गुजरातच्या हातातून कसा गेला?
गुजरातनं 205 धावा केल्या. त्याचाच पाठलाग करताना उतरलेल्या आरसीबीने पहिल्याच षटकात विकेट गमावली असती. पहिलं षटक टाकायला मोहम्मद सिराज आला आणि त्याच षटकात विराट कोहली शून्यावर असतानाच त्याचा झेल वाशिंग्टन सुंदर याच्याकडे गेला पण त्यानं तो झेल सोडला. याच्या परिणामी विराटनं आक्रमक खेळी करत 81 धावा मारल्या आणि आरसीबीला विजय मिळवून देण्यात मोठी मदत केली.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.